मुंबई : सोशल मीडियावर सध्या भारतीय क्रिकेट संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणची जोरदार चर्चा चालू आहे. चर्चेच कारण म्हणजे त्याची पत्नी इरफानची पत्नी सफा बेग ही फारच सुंदर आहे. सोशल मीडियावर नेहमीच तिच्या सुंदरतेची चर्चा होत असते. नुकतंच इरफानने पत्नी आणि मुलासोबत एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. त्या फोटोची सर्वत्र चर्चाही झाली मात्र, त्या फोटोमुळे नेटकऱ्यांनी इरफानला फार ट्रोल देखील केले.
त्याने पोस्ट केलेल्या फोटोत पत्नी सफा बेग हिचा चेहरा ब्लर केला होता. असा फोटो सोशल मीडियावर फोटो पोस्ट केल्याने त्याच्यावर टीका होत आहे. त्याने आपल्या पत्नीच्या फोटो ब्लर केल्याने नेटकऱ्यांनी चांगलेच धारेवर धरले आहे.
यावर इरफाननेही नेटकऱ्यांना फटकारले आहे. इफरफनने हा फोटो पुन्हा पोस्ट करत लिहिले, ‘हा फोटो माझ्या क्वीनने माझ्या मुलाच्या अकाऊंटवरुन फोटो पोस्ट केला होता. पण या फोटोमुळे लोकांच्या खूप नकारात्मकतेला सामोरं जावं लागत आहे. मला तो फोटो इथेही पोस्ट करू द्या. माझ्या पत्नीने स्वत:च्या मर्जीने तो फोटो ब्लर केला आहे आणि मी तिचा मालक नाही तिचा सोबती असल्याचं इरफान पठाणने म्हटलं आहे.’
https://twitter.com/IrfanPathan/status/1397222446328131595?s=20
इरफान पठाण आपली पत्नी सफा बेगसोबतचे फोटो पोस्ट करतो त्यामध्ये सफाचा चेहरा कायम झाकलेला दिसतो. सफा बेग हिच्या चेहर्यावर नेहमी बुरखा असतो किंवा ती स्वत: चा चेहरा हाताने लपवते. मात्र आता या फोटोमुळे इरफानला ट्रोलर्सचा सामना करावा लागला.
महत्त्वाच्या बातम्या
- अधुरी एक कहाणी… प्रेयसीचा जीव वाचवण्यासाठी प्रियकराने केली आत्महत्या
- देशावर ब्लॅक फंगसचे संकट ; केंद्र सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
- लॉकडाऊन नंतर पर्यटकांना उत्कृष्ट सेवा देण्यासाठी MTDC आणि कर्मचाऱ्यांनी कंबर कसली
- विनाकारण फिरणाऱ्या ५०७ जणांची तपासणी, सलग तिसऱ्या दिवशी शून्य पॉझिटिव्ह!
- शिवराज नारियलवाले मारहाण प्रकरणी पोलीस उपनिरीक्षकासह ५ कर्मचारी निलंबित
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

