Share

‘मी पुन्हा येईन’, लाजिरवाण्या कामगिरीचा फोटो शेअर करत पूरन स्वतःलाच देत आहे प्रेरणा

Published On: 

मुंबई : राज्य आणि देशात गेल्या काही आठवड्यापासून कोरोनाच्या संसर्गाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. कोरोनाच्या या काळात भारतात आयपीएल स्पर्धा सुरु होती. मात्र स्पर्धेत कोरनाचा शिरकाव झाला आणि बीसीसीआयने उर्वरित स्पर्धा रद्द केली. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पहिल्यांदाच आयपीएल स्पर्धा अर्ध्यातच स्थगित करवी लागत आहे.

आता ही उर्वरीत स्पर्धा लवकर सुरु होणार नसल्याने आयपीएल स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व क्रिकेटपटूंना आपल्या घरी जाण्याच्या सूचना बीसीसीआने दिल्या आहेत. आयपीएल जरी स्थगित झाली असली तरी खेळाडूंना वारंवार आयपीएलची आठवण येताना दिसत आहे.

यातच निकोलस पूरन ट्विट करत मी पुन्हा येईल असे म्हंटले आहे. या आयपीएल हंगामातील लाजीरवाण्या कामगिरीनंतरही पूरनची जिद्द कमी झालेली नाही. त्यानं स्वत:च्याच कामगिरीचा फोटो ट्विटरवर शेअर करत ‘मी पुन्हा येणार’ असल्याचे संकेत दिले आहेत. ‘ही स्पर्धा स्थगित करण्याचं कारण वेदनादायी असलं तरी आवश्यक होतं. आयपीएल लवकरच आपली भेट होईल. मी हा फोटो मला प्रेरणा मिळावी म्हणून शेअर करत आहे. मी पूर्वीपेक्षा अधिक जोमाने परत येईन. सर्वांनी सुरक्षित राहवं,’ असं ट्विट पूरननं केलं आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!