जळगाव:- कृषी कायद्यांविरोधात राजधानी दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला आता ६० दिवस उलटून गेलेत. केंद्रातील मोदी सरकारकडून लागू करण्यात आलेल्या कृषी कायद्यांविरोधात २६ नोव्हेंबरपासून शेतकरी दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून बसलेत. या शेतकऱ्यांत विशेषत: पंजाब आणि हरीयाणातल्या शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे. असं असलं तरी देशभरातील विविध शेतकरी संघटना आणि श्रमिक संघटनांनी शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे.
कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी प्रजासत्ताक दिनी (26 जानेवारी) आयोजित केलेल्या ट्रॅक्टर रॅलीला दिल्लीमध्ये हिंसक वळण लागले. या हिंसाचारात अनेक शेतकरी तसेच पोलीससुद्धा जखमी झाले. या चिघळलेल्या परिस्थितीचे अनेक व्हिडीओ आणि फोटो सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखे व्हायरल होत आहेत.
काही आंदोलकांनी तर थेट पोलिसांवरच हात उचला. काहींनी पोलिसांवर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न केला. या हिसांचारात अनेक पोलिस जखमी झाले आहेत. जखमी पोलिसांचा आकडा 83 असल्याची माहिती PTI या वृत्तसंस्थेनं दिली आहे. जखमी पोलिसांमधील 45 जणांना ट्रॉमा सेंटरमध्ये भरती करण्यात आले आहे.
दरम्यान, नवीन कृषी कायद्यांविरोधात दिल्लीत शेतकरी अनेक दिवसांपासून आंदोलन करत आहेत. आंदोलनाला आता व्यापक स्वरूप आले आहे. त्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष करणं भाजपला महागात पडेल, असा टीका राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केली आहे.
तसेच आता आदिवासी शेतकरीही आंदोलनात उतरला आहे. त्यामळे हे आंदोलन एक व्यापक झाले आहे. मात्र केंद्रातले भाजप सरकार त्याकडे दुर्लक्ष करत आहे. त्यांना ते महागात पडेल, असे पाटील म्हणाले. राज्याचे राज्यपालांनी शेतकऱ्यांना भेट न दिल्याबद्दल पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करणे चुकीचे असल्याचे त्यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
- न दिसणाऱ्या शत्रू संगे युद्ध आमुचे सुरु- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
- आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी हिंसाचाराचा मार्ग सोडून शांतता राखावी : दिल्ली पोलीस
- ‘विजय वडेट्टीवार यांच्या तोंडाला काळे फासणाऱ्यास जशास तसे उत्तर दिले जाईल’
- दिल्ली धुमसतीये : १८ पोलीस जखमी तर एकाची प्रकृती गंभीर
- अल्पवयीन मुलीचे अपहरण करणारा गजाआड
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

