🕒 1 min read
औरंगाबाद : गंगापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या सुशोभीकरणाचे काम सुरु करण्यात आले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत आ. प्रशांत बंब यांच्या मार्गदर्शनाखाली व लोकनियुक्त नगराध्यक्ष वंदना पाटील यांच्या प्रयत्नातून तब्बल ३० वर्षे दुर्लक्षित असलेला छत्रपती शिवाजी महाराज चौक नव्याने साकारला जात आहे. या चौकाच्या सुशोभीकरणाच्या कामाचे उद्घाटन आमदार प्रशांत बंब यांच्या हस्ते आयोजित करण्यात आले होते.
आमदार प्रशांत बंब यांच्या हस्ते रस्त्याच्या दुभाजकांमध्ये वृक्षारोपण करून शहरातील चौकांची पाहणी करण्यात आली. त्यावेळी त्यांनी नागरिकांशी कामाबाबत संवाद साधला. महाराणा प्रताप चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, राजीव गांधी चौक या सर्व चौकांचे सुशोभीकरण कामाची मंजूरी झाली असून या सर्व चौकांचे कामांची सुरुवात काही दिवसात होणार आहे. आपण सर्वांनी या कामांना सहकार्य करावे. तसेच नगरसेवक प्रदीप पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले, छत्रपती शिवाजी महाराज चौकात सुशोभीकरण करून त्याठिकाणी राजमुद्रा बसविण्यात येणार आहे.
सर्व चौक स्थापन करणाऱ्या नागरिकांचे मी मनापासून आभार मानतो. त्यांनी खूप कष्ट करून चौक स्थापन केले आहेत. येणाऱ्या काही दिवसांत महाराणा प्रताप चौक व डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, राजीव गांधी चौकाच्या सुशोभीकरणाचे काम हाती घेण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौकाचे प्रातिनिधिक स्वरूपात अशोक कळसकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. १९९१ रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौकाची स्थापना ज्यांनी केली होती ते शिवप्रेमी अशोक कळसकर, बाबा बने, भगवानसिंग राजपूत यांच्यासह असंख्य शिवप्रेमींनी या कामास प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत केली. त्यामुळे या सर्व शिवप्रेमींचा आमदार प्रशांत बंब यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
महत्त्वाच्या बातम्या
- अंमली पदार्थाच्या विक्रीविरोधात भाजप आमदारांचा मोर्चा
- अभिनेता परेश रावल ‘omg 2’ चित्रपटात दिसणार नाही.., कोण साकारणार ‘ही’ भूमिका?
- लखीमपूर हिंसाचार प्रकरणी संजय राऊत घेणार राहुल गांधींची भेट
- ‘शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न उत्तर प्रदेशमधील सरकार करत आहे’
- सोमय्यांना मोठा दिलासा; मानहानीच्या खटल्यात अखेर जामीन मंजू
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
