🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा: थंडी (Winter) ने दार ठोठावले आहे. त्याचबरोबर या गुलाबी थंडीच्या वातावरणात मनात एकच विचार येतो तो म्हणजे फिरण्याचा (Travel). कारण या ऋतूमध्ये फिरण्याची एक वेगळीच मजा असते. त्यामुळे या वातावरणामध्ये अनेक पर्यटकांचे फिरायला जाण्याची प्लॅन देखील सुरू झाले असेल. अशा परिस्थितीत अनेक वेळा आपला खिसा आपल्याला फिरण्यासाठी परवानगी देत नाही. कारण अनेकदा बजेटमुळे आपण आपल्या ट्रीप कॅन्सल करतो. पण तुम्हाला जर या गुलाबी थंडीमध्ये फिरायला जायचे असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कारण या बातमीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला काही ठिकाणांबद्दल माहिती सांगणार आहोत जिथे तुम्ही बजेटमध्ये ट्रिप करू शकता. त्याचबरोबर गुलाबी थंडीमध्ये प्रवासाचा अविस्मरणीय अनुभव घेऊ शकता.
मसुरी
भारतातील उत्तराखंड राज्यांमध्ये स्थित असलेल्या मसूरी हे शहर फिरण्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे. हिवाळ्यामध्ये मसुरी मध्ये सर्वोत्तम निसर्गाचे नजारे बघायला मिळतात. या ठिकाणी खूप थंडी असते. मसूरी मध्ये तुम्हाला सातशे ते आठशे रुपये पर्यंत राहायला चांगले हॉटेल्स पर्याय उपलब्ध आहेत. त्याचबरोबर येथील हिमालयाचे दृश्य तुम्हाला अविस्मरणीय अनुभव देतील.
मॅक्लॉडगंज
मॅक्लॉडगंज येथे तुम्हाला तिबेटियन संस्कृती अनुभवायला मिळेल. त्याचबरोबर इथे प्रसिद्ध तिबेटी अध्यात्मिक नेते दलाई लामा यांचे सुद्धा घर आहे. जे खूप लोकप्रिय आहे. या ठिकाणी तुम्ही दिल्लीहून फक्त सातशे रुपयांमध्ये पोहोचू शकतात. मॅक्लॉडगंज तुम्हाला निसर्गाचे अनोखे नजारे देखील बघायला मिळतील.
नारकंडा
या गुलाबी थंडीमध्ये तुम्ही जर बजेट टूर आखात असाल तर नारकंडा हे तुमच्यासाठी सर्वोत्तम ठिकाण आहे. या ठिकाणी तुम्हाला कमीत कमी किमतीमध्ये हॉटेल्स पर्याय राहण्यासाठी उपलब्ध आहेत. त्यामुळे या ठिकाणी तुमची बजेट फ्रेंडली ट्रीप होऊ शकते.
उदयपूर
भारतातील राजस्थानमधील उदयपूर हे एक प्रमुख पर्यटन शहर आहे ज्याला तलावांचे शहर म्हणून देखील ओळखले जाते. जयपुर मध्ये तुम्हाला सुंदर तलावांसोबतच भव्य राजवाडे देखील बघायला मिळतील. त्याचबरोबर उदयपूर घरातील लेक पिचोलाला तुम्ही बोटी मधून प्रवास करत अविस्मरणीय अनुभव घेऊ शकतात. त्याचबरोबर उदयपूरला तुम्हाला स्वस्तामध्ये राहण्यासाठी आणि खाण्यासाठी भरपूर पर्याय मिळतील.
महत्वाच्या बातम्या
- Jitendra Awhad | आरोपांबाबत बोलताना जितेंद्र आव्हाड झाले भावूक; म्हणाले, “माझ्या खुनाचं षडयंत्र रचलं असतं तरी…”
- Vidya Chavan | “…तर मुंबईत दिसवसाला लाखोंमध्ये गुन्हे दाखल होतील” ; विद्या चव्हाण यांचे वक्तव्य
- Jayant Patil | “तक्रारीपूर्वी ‘ती’ महिला एकनाथ शिंदेंना भेटली” ; जयंत पाटील यांचा गौप्यस्फोट
- Travel Guide | हिवाळ्यामध्ये जोडीदारासोबत फिरायचा प्लॅन करत असाल, तर नॉर्थ-ईस्ट मधील ‘ही’ ठिकाणं आहेत परफेक्ट डेस्टिनेशन
- Supriya Sule | जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा आरोप, सुप्रिया सुळे म्हणाल्या…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
