सातारा : महाराष्ट्रात मराठा आरक्षणाच्या स्थगितीनंतर वातावरण चांगलंच तापलेलं पाहायला मिळालं. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणास स्थगिती दिल्यानंतर राज्यभरात मराठा समाजाने आक्रमक होऊन आंदोलने केली. यानंतर, स्थगिती उठवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकारने याचिका दाखल केल्या.
मात्र, आरक्षणप्रश्नी महाविकास आघाडी सरकार गंभीर नसल्याचा आरोप मराठा समाज समन्वयकांसह भाजप नेत्यांनी केला होता. आज, खासदार उदयनराजे भोसले यांनी मराठा आरक्षणप्रश्नी पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारवर ताशेरे ओढले आहेत. त्यांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न लवकरात लवकर सोडवावा अशी मागणी केली आहे.
”जातीचं राजकारण करायचं असेल तर राजीनामा द्या आणि घरी बसा,’ असा इशाराच त्यांनी राज्यकर्त्यांना दिला आहे. ‘आरक्षणाचा प्रश्न हा सुटणारच. मराठा समाजाला आरक्षण मिळणार असून सद्या होणाऱ्या प्रवेशांमध्ये देखील मराठा विद्यार्थ्यांना राखीव जागा ठेवण्यात याव्यात’ अशी मागणी देखील उदयनराजेंनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘सामान्य जनतेला परवडेल अशा किंमतीत कोरोनावरील लसीचे वितरण सर्वप्रथम भारतात होणार’
- ‘अजित पवारांवर लक्ष्य ठेवा असं अलीकडे सांगितलं जातंय, पण…’
- केंद्र सरकार अखेर नरमलं,अमित शाह यांनी केले ‘हे’ आवाहन
- महात्मा फुलेंनी सुरू केलं होतं ते मिशन आगामी काळात आपण पूर्ण करू : चंद्रकांत पाटील
- बिबट्यास शोधून जेरबंद करण्यासाठी तब्बल सतरा पथके स्थापन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

