Share

‘हिंमत असेल तर अहमदाबादचे कर्णावती करून दाखवा’ : शिवसेना

Published On: 

मुंबई : हिंमत असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि गुजरात चे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी ‘अहमदाबाद’ चे नामांतर ‘कर्णावती’ करुन दाखवावे, असे आव्हान शिवसेनेचे राष्ट्रीय संघटक हेमराज शाह यांनी दिले.

शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अनुमतीने आज शिवसेनेच्या मालाड येथे झालेल्या शिवसेनेच्या गुजराती भाषिकांच्या मेळाव्यात अहमदाबादचे नामांतर कर्णावती करण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला, असे सांगून हेमराज शाह म्हणाले की, ‘अहमदाबाद’ला कर्णावती हे नाव आहे. परंतू रितसर ‘कर्णावती’ हे नाव सरकार दरबारी अधिकृत करण्यात आलेले नाही. अहमदाबादला तेथील जनता कर्णावती म्हणून ओळखते आणि या नावाला सुद्धा एक इतिहास आहे. मग परकीय आक्रमण करणाऱ्यांची नावे बदलून आपली अस्मिता जोपासणारी नावे देण्यात हरकत काय आहे ?असा सवाल त्यांनी केला.

२०१४ पासून नरेंद्र मोदी हे पंतप्रधान असतांना औरंगाबाद आणि उस्मानाबाद चे नामांतर करु शकले नाहीत. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना ‘भारतरत्न’ किताब देऊ शकले नाहीत. समान नागरी कायदा होण्याबाबत ‘अब समय आ गया है !’ असे देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे आवर्जून सांगतात परंतू ती वेळ अजूनही आलेला नाही, पर्यायाने ते होऊ शकलेले नाही.

आज देशात लाखो शेतकरी आपल्या न्याय्य हक्कांसाठी लढा देत असतांना, त्यांचे आंदोलन चिरडून टाकण्याचा प्रयत्न होतो आहे. लोकांच्या भावनांशी खेळण्यापेक्षा त्यांच्या भावनांचा आदर करा आणि ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’ या केवळ घोषणा न राहता त्या अंमलात कशा येतील त्यासाठी प्रयत्न करा. औरंगाबाद, उस्मानाबाद या बरोबरच अहमदाबाद चे नामांतर करण्यात यावे, तशाच पद्धतीने मोगलांच्या, ब्रिटीशांच्या खुणा, आठवणी पुसून काढाव्यात, असे कळकळीचे आवाहन हेमराज शाह यांनी शेवटी केले.

महत्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!