मुंबई – शिवसेनेचा दसरा मेळावा आज मुंबईत पार पडला. या मेळाव्यात बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. यावेळी त्यांनी सरकार पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजपवर टीका केली. ते म्हणाले, हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा असं भाजपला आव्हान दिले. छापा टाकायचा आणि काटा काढायचा, हे जास्त काळ चालू शकत नाही असा टोला देखील त्यांनी यावेळी विरोधकांना लगावला.
दसरा मेळावा – २०२१ https://t.co/FRGcUiJQJx
— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) October 15, 2021
मी फकीर नाही, झोळी घेऊन जाईन असं म्हणणार नाही, असा टोला मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिला आहे. हर हर महादेव काय असतं हे दिल्लीच्या तख्ताला दाखवावं लागणार आहे, असे देखील म्हणाले. पुत्र कर्तव्य म्हणून राजकरणात आलो आहे. अंगात धमक असेल तर अंगावर या, ईडी, सीबीआयची मदत घेऊ नका, असे देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
ठाकरे म्हणाले, आज दोन मेळावे असतात. एक आपला आणि दुसरा आरएसएसचा. आपले विचार एक आहेत. पण धारा वेगळ्या असू शकतात. विचार एक होत्या, आहेत म्हणूनच भाजपसोबत युती केली होती. ज्यांना अजूनही वाटतं ते मुख्यमंत्री राहिले असते, कदाचित राहिले असते. जर तुम्ही शिवसेनेला दिलेलं वचन मोडलं नसतं तर तुम्हीसुद्धा आज नाहीतर उद्या मुख्यमंत्री राहिले असता. पण नशिबात नव्हतं म्हणून तुम्ही वचन तोडलंत. मी हे पद स्वीकारलं ते एका जबाबदारीने स्वीकारलं. मी केवळ माझ्या पित्याला दिलेलं वचन म्हणून मी हे पद स्वीकारलं.
महत्वाच्या बातम्या
- ‘अंगात धमक असेल तर अंगावर या, ईडी, सीबीआयची मदत घेऊ नका’
- खरकटं उष्ट खाणाऱ्या, निर्लज्ज लोकांचा देश म्हणजे हिंदुस्थान; संभाजी भिडेंचं पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य
- मुख्यमंत्री पातळीवर रात्रीतून मोठ्या हालचाली, शिवसेनेच्या दसरा मेळाव्यातील अडथळे केले दूर
- प्रदीर्घ काळानंतर लवकरच’सकिनाची प्रेमकथा’;सनी देओलने केली घोषणा..!
- कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रोहित पवारांवर प्रशासन कारवाई करण्याची हिम्मत दाखवणार ?


