🕒 1 min read
मुंबई : महाविकास आघाडी सरकारने मुसलीम आरक्षणाला हिरवा कंदिल दाखवला आहे. राज्यसरकार लवकरच मुस्लिमांना शैक्षणिक संस्थांमध्ये पाच टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेणार असल्यचे जाहीर केले आहे. तर शिवसेनेनेही मुस्लीम आरक्षणाला पाठींबा दिला आहे. तर धर्माच्या आधारावर ठाकरे सरकारने आरक्षण देऊ नये, जर आरक्षण दिल्यास आंदोलन करु, असा इशारा विश्व हिंदू परिषदेने दिला.
मुस्लिमांना शैक्षणिक संस्थांमध्ये पाच टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. या संदर्भातील अध्यादेश काढणार असल्याची माहिती अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी शुक्रवारी 28 फेब्रुवारीला दिली. त्यानंतर विश्व हिंदू परिषदेने मुस्लिमांच्या 5 टक्के आरक्षणाला कडाडून विरोध केला आहे. हिंदुत्ववादी शिवसेना मुस्लिम आरक्षणाचा विचार करते हे दुर्भाग्यपूर्ण आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर काँग्रेस-राष्ट्रवादीचा असर व्हायला लागला असल्याची खरमरीत टीका विश्व हिंदू परिषदेने केली आहे.
सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार मुस्लिम समाजासाठी शैक्षणिक संस्थांमध्ये 5 टक्के आरक्षणाचा अद्यादेश काढून कायदा तयार करणार आहे. शिवाय आरक्षण लागू करण्याबाबत सरकार विचाराधीन असल्याची माहिती राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासाला दिली.
मागील सरकारने मुस्लिम समाजाच्या आरक्षणासाठी अध्येदेश काढला होता. त्याचप्रमाणे महाराष्ट्र विकास आघाडी सरकार देखील सुप्रीम कोर्टच्या निर्देशानुसार मुस्लिम समाजासाठी शैक्षणिक संस्थांमध्ये 5 टक्के आरक्षणाचा अध्यादेश काढून कायदा तयार करणार असल्याचे नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

