Share

‘काम करता येत नसेल तर सत्ता भाजपाकडे सुपूर्द करा’ ; खासदार सुजय विखेंचा महाविकास आघाडीवर घणाघात

Published On: 

अहमदनगर : भाजपाचे सर्वाधिक १०५ आमदार असून देखील शिवसेनेने ऐनवेळी महायुती सोडून विरोधी पक्ष समजल्या जाणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सोबत जाऊन महाविकास आघाडीचे सरकार राज्यात स्थापन केले. यानंतर हे सरकार विरोधी विचारधारा असलेल्या पक्षांचे असून फार काळ टिकणार नाही अशी टीका विरोधी बाकावर बसलेल्या भाजपाकडून वारंवार केला गेला. मात्र, हे सरकार ५ वर्षांचा कालावधी पूर्ण करणार असून भाजपाला पुढे देखील विरोधी बाकावरच बसावे लागणार असे महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून प्रत्युत्तर दिले गेले.

यानंतर कोरोना काळात देखील राजकारण तापलेलं पाहायला मिळत असतानाच खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे.  “राज्यातील जनतेला न्याय देण्याची जबाबदारी महाविकास आघाडी सरकारची आहे. जर तुम्हाला काम करता येत नसेल तर सत्ता भाजपकडे सुपूर्द करा. ” तसेच, ” स्वतःच्या स्वार्थासाठी तीन पक्ष एकत्र आले आहे,” असा टोला देखील त्यांनी यावेळी लगावला आहे.

रोहित शर्मा, विनेश फोगाटसह 4 खेळाडूंची खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस

संजय राऊत यांनी केलेल्या विधानावर देखील यावेळी सुजय विखेंनी भाष्य केले. “खासदार संजय राऊतांचे वक्तव्य निंदनीय आहे. त्यामुळे संजय राऊतांनी डॉक्टरांची माफी मागावी. संजय राऊतांनी जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या डॉक्टरांचा अवमान केला आहे. WHO आणि डॉक्टरांपेक्षा आपण आणि आपला पक्ष जर हुशार आहात तर कोरोना का थांबवला नाही,” असा घणाघात देखील त्यांनी केला.

सुशांत सिंग राजपूत प्रकरण : सिनेसृष्टीत कुठल्याही प्रकारची माफियागिरी नाही – नसीरुद्दीन शाह

डॉ. सुजय विखे पाटील हे माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र आहेत. २०१९ मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करत अहमदनगर मधून लोकसभा निवडणूक लढवली होती. तर, राधाकृष्ण विखे पाटलांनी देखील मुलापाठोपाठ जुलै मध्ये २०१९ मध्ये काँग्रेसला राम राम करत भाजपामध्ये प्रवेश केला होता.

राम मंदिर प्रकरणी भडकाऊ पोस्ट केल्यामुळे पत्रकाराला अटक

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!