Share

सुशांत सिंग राजपूत प्रकरण : सिनेसृष्टीत कुठल्याही प्रकारची माफियागिरी नाही – नसीरुद्दीन शाह

Published On: 

मुंबई- सध्या देशभरात सुशांत सिंग राजपूत प्रकरण गाजत आहे. या प्रकरणामुळे घराणेशाहीवर सध्या सडकून टीका होत आहे. अनेक जण अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणाचा संबंध बॉलिवूडमधील माफीयाराजशी देखील जोडत आहेत.

दरम्यान,सिनेसृष्टीत कुठल्याही प्रकारची माफियागिरी नाही, असं मत अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी व्यक्त केलं आहे. काही माध्यम संस्थांनी केवळ टीआरपी मिळवण्यासाठी निर्माण केलेल्या या काल्पनिक संकल्पना आहेत असं ते म्हणाले.

नसीर म्हणाले,सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूचा तपास आता एकप्रकारचा रिअ;ॅलिटी शो बनला आहे. तुम्ही याला फॉलो करत आहात?यात राजकारण आहे. काही मीडिया हाऊसचे असंवेदनशील मीडिया कव्हरेज आहे आणि सुशांतला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही लढत आहोत म्हणणारे काही लोक आहे. हा सगळा वेडेपणा आहे. शुद्ध वेडेपणा. मी याला अजिबात फॉलो केले नाही.

तो तरूण मुलगा गेला, तेव्हा मला प्रचंड दु:ख झाले. मी त्याला ओळखत नव्हतो. पण त्याचे भविष्य उज्ज्वल होते आणि आता ते व्यर्थ झाले. पण असे असले तरी मी या प्रकरणावरून सुरु असलेला बकवासपणा फॉलो केलेला नाही. बॉलिवूडबद्दल फ्रस्टेशन असणारा प्रत्येकजण मीडियासमोर येऊन वाट्टेल ते बरळत आहे. हा प्रकार खरोखर नीचपणा आहे असे नसीर म्हणाले.

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!