Share

राम मंदिर प्रकरणी भडकाऊ पोस्ट केल्यामुळे पत्रकाराला अटक

Published On: 

नवी दिल्ली : अयोध्येत ५ ऑगस्ट रोजी अनेक वर्ष संघर्षातून साकार होणाऱ्या राम मंदिर भूमीपूजनाचा कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कोरोनाचे संकट असल्याने मोजक्याच निमंत्रितांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम करण्यात आला.

राम मंदिर भूमीपूजनावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि भूमीपूजनावरून भडकाऊ ट्विट केल्यामुळे उत्तर प्रदेश पोलिसांनी पत्रकार प्रशांत कनौजिया यांना दिल्लीतील निवासस्थानातून ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांनी केलेल्या ट्विटमुळे अटक करण्यात आल्याची माहिती सद्या समोर येत आहे. लखनऊ येथील हजरतगंज पोलीस ठाण्यात कनौजिया यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

परळीतील अँटिजेन टेस्टिंग केंद्रांना पालकमंत्री धनंजय मुंडेंनी दिली अचानक भेट

दरम्यान, प्रशांत यांनी राष्ट्रपती कोविंद यांना उद्देशून एक ट्विट केले होते. ‘ तुम्हाला का नाही बोलावलं? ते तुम्हाला खालच्या वर्गाचं मानतात, ‘अशा आशयाचे समाजात तेढ निर्माण होईल असे ट्विट केले होते. त्यामुळे त्यांना, जातीय तेढ निर्माण करण्याच्या आरोपाखाली दिल्ली व युपी पोलिसांनी संयुक्त कारवाई करत अटक केली आहे. यापूर्वी देखील जून २०१९ मध्ये प्रशांत कनौजिया यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावेळी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविरुद्ध आपत्तीजनक टीका केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता.

‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खासदार राऊत यांना थोडा आवर घालावा’

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!