टीम महाराष्ट्र देशा: भाजपच्या ऑपरेशन लोटसची चिरफाड करत, आम्ही ठरवलं तर सर्वात जास्त चिरफाड आम्ही करु शकतो आणि अनेक ऑपरेशन करु शकतो, असा इशाराच शिवसेना खासदार संजय राउत यांनी विरोधीपक्ष असलेल्या भाजपला दिला आहे .
शिवसेनेत कोणाच्याही नाराजाचं आव्हान आमच्यासमोर नाही . महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा हे प्रत्येक शिवसैनिकाचं स्वप्न होतं. त्यामुळे प्रत्येक शिवसैनिक पक्षाच्या पाठिशी उभं राहिलं.
विरोधात बसण्यापेक्षा सत्ताधारी पक्षात आहोत, याचं सर्वांना समाधान वाटलं पाहिजे, असं संजय राऊतांनी नाराजांना उद्देशून म्हटलं आहे.
भाजपचे ऑपरेशन लोटस राज्यात सुरु झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मात्र ऑपरेशन लोटस वैगेरे असं काही नसतं. आम्ही ठरवलं तर सर्वात जास्त चिरफाड आम्ही करु शकतो आणि अनेक ऑपरेशन करु शकतो.
विरोधी पक्षातील लोक असे हातखंडे वापरत असतात. याबाबत आम्ही विरोधी पक्षाच्या अशा प्रयत्नांकडे मनोरंजन म्हणून पाहतो. त्यामुळे सरकारची आणि लोकांनी प्रकृती चांगली राहते म्हणून असे मनोरंजनाचे कार्यक्रम झाले पाहिजेत. विरोधी पक्ष मनोरंजनाचं काम करत असेल तर त्यांनी ते करत राहावं. सांस्कृतिक मंत्रालयाने अशा कार्यक्रमांना रॉयल्टी देण्याची तरतूद करावी, असा चिमटा राऊतंनी विरोधीपक्ष असलेल्या भाजपला काढला .
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

