टीम महाराष्ट्र देशा : राज्यात चांगला पाऊस पडत असला तरी बीड जिल्ह्याकडे पावसाने पाठ फिरवली आहे. त्यामुळे जिल्ह्यात अजूनही टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. पंकजा मुंडे यांनी नागरिकांची भेट घेवून त्यांच्याशी चर्चा केली.
परळीत नगरपरिषदेकडून शहरातील नागरिकांना पाणी वाटप करताना भेदभाव होत असल्याचा आरोप होत आहे. यासंबंधी पंकजा मुंडेंनी नागरिकांची भेट घेतली आणि त्यांना ‘पाणी पुरवठ्यात कोणतीही अडचण येत असेल तर मला सांगा. हे टँकर नगरपालिकेचे नाहीत तर सरकारकडून देण्यात येत आहेत आणि आज सरकार मीच आहे असं विधान केले आहे.
दरम्यान, जुलैचा पहिला आठवडा उलटून गेला तरीही मराठवाड्यात पावसाने हजेरी लावलेली नाही. त्यामुळे अजूनही नागरिकांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे या ठिकाणची परिस्थिती अजूनही भीषण आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

