Share

नगरकरांची मागणी असेल तर माझा जनता कर्फ्यूला पाठिंबा- संग्राम जगताप

Published On: 

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- अहमदनगर जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढतच आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्ह्यातील राहुरी, श्रीरामपूर, शेवगाव, अकोले ह्या तालुक्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. अहमदनगर शहरात दररोज मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रूग्ण सापडत असून देखील शहरात लॉकडाऊन का होत नाही, असा प्रश्‍न आता उपस्थित होत आहे. अहमदनगरमधील व्यापारी असोसिएशन, सामाजिक संघटना, विविध संस्था यांनी पुढाकार घेतल्यास आणि नगरकरांची मागणी असेल तर नगरमध्ये जनता कर्फ्यूसाठी मी तयार असल्याचे आ.संग्राम जगताप यांनी म्हटले आहे.

संपूर्ण जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा २८ हजारांच्या पुढे आहे. नगर शहरात तर रोज मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळत असून, मृतांच्या आकड्यातही वाढ होत आहे. नगरमध्ये कोरोनाच्या वाढत्या रुग्णांची संख्या जिल्ह्यातील लॉकडाऊन झालेल्या तालुक्यांच्या तुलनेत मोठी आहे. या ठिकाणची परिस्थिती लॉकडाऊनसारखी असेल, तर नगरमध्ये आणखी काय घडायला पाहिजे म्हणजे प्रशासन लॉकडाऊन करेल, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

आ.संग्राम जगताप म्हणाले, विविध संघटनांकडून नगरमध्ये जनता कर्फ्यूची मागणी पुढे येत आहे. त्यामुळे नगरमधील व्यापारी असोसिएशन, सामाजिक संघटना, विविध संस्था यांनी पुढाकार घेतल्यास आणि नगरकरांची मागणी असेल तर नगरमध्ये जनता कर्फ्यूसाठी मी तयार असल्याचे आ.जगताप यांनी सांगितले. तसेच नगरकरांना कोरोना काळात कोणतीही अडचण आल्यास नागरिकांनी थेट संपर्क करावा असे आवाहनही आ.जगताप यांनी केले आहे.

महत्वाच्या बातम्या:-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!