Share

‘या’ दिवसापासून शाळा सुरु होणार ; शिक्षणमंत्र्यांची माहिती

Published On: 

मुंबई : केंद्र सरकारने 21 सप्टेंबरपासून नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा प्रत्यक्ष उघडण्याची मुभा दिली असली, तरी महाराष्ट्रात नोव्हेंबर महिना उजाडणार आहे. शिक्षण विभागाने संस्था चालकांची बैठक घेतली या बैठकीमध्ये 21 सप्टेंबरला शाळा चालू करण्यास संस्था चालकांनी स्पष्टपणे नकार दिला असून याबाबतचा निर्णय दिवाळीनंतरच घेतला जाणार असल्याचे वर्षा गायकवाड यांनी सांगितलं आहे.

याबाबतची एसओपीही जाहीर करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या सूचनेप्रमाणे 21 सप्टेंबरपासून नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरु करता येतील का? याबाबत चाचपणी करण्यासाठी शिक्षण विभागाने शुक्रवारी संस्थाचालक महा मंडळाची बैठक घेतली होती. महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या पाहता इतक्यात शाळा उघडणे योग्य ठरणार नाही, अशी भूमिका संस्थाचालकांनी ऑनलाईन बैठकीत घेतलीमहाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे उपाध्यक्ष वसंत घुईखेडकर, रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अनिल पाटील, युनिसेफच्या रेशमा अग्रवाल यांच्यासह शिक्षण विभागातील विविध अधिकारी, शिक्षणाधिकारी उपस्थित होते.

कोरोनाचा संसर्ग ग्रामीण भागातही पसरत असल्याने 21 सप्टेंबरपासून मुलांना शाळेत पाठवण्यास पालकही राजी होणार नाहीत, निवासी शाळा तर कोणत्याही परिस्थितीत सुरु होता कामा नयेत. गेल्या वर्षीचे वेतनेतर अनुदान परत गेल्याने सॅनिटायझर, निर्जंतुकीकरण आणि स्वच्छता साहित्य खरेदीसाठी ते तातडीने देण्याची मागणी बैठकीत करण्यात आली. दिवाळी 13 ते 16 नोव्हेंबरदरम्यान असल्याने आणखी दोन महिने तरी विद्यार्थ्यांना शाळेत जावे लागणार नाही. मात्र ऑनलाईन शिक्षण सुरुच राहणार आहे.

महत्वाच्या बातम्या

कोरोनामुळे अहमदनगरमधील पुरोहितांकडून पंधरा दिवस दशक्रिया विधी न करण्याचा निर्णय!

राज्यात महाराष्ट्र सरकारचा ‘गुंडा राज’; पुन्हा एकदा कंगना रनौतने महाराष्ट्र सरकारवर ओढले ताशेरे

अभिनेता कुशल बद्रिकेने मांडली ठाणेकरांची व्यथा, महापालिकेकडे हि विनंती

 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!