Share

Jitendra Awhad | “आमची झोप मोडून जर रेल्वे प्रवास करणार असेल तर… “; आव्हाडांचा इशारा

Published On: 

मुंबई : माजीमंत्री तथा स्थानिक आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मध्यस्थी करत रेल्वे प्रशासनाला धारेवर धरले होते. हे आंदोलन आणि आव्हाडांच्या पाठपुराव्यानंतर रेल्वेने काही एसी गाड्या रद्द केल्या. मात्र गर्दीच्या काळात एसी गाड्या चालवणे आम्हाला मान्य नसून गर्दीच्या काळात या एसी गाड्या रद्द करण्यात याव्या एवढीच आमची मागणी असल्याचे आव्हाड यांनी सांगितले. आमची मागणी रेल्वे प्रशासनाने घेतली नाही तर मोठ्या प्रमाणात रेलरोको करण्याचा इशारा यावेळी सर्वसामान्यांच्या बाजूने आव्हाड यांनी केला आहे. आमची झोप मोडून जर रेल्वे प्रवास करणार असेल हे आम्हाला मान्य नाही. असं रेल्वे प्रशासनाला जितेंद्र आव्हाड यांचा इशारा.

भविष्यात प्रत्येक रेल्वे स्टेशन वर हजारोंच्या संख्येने हे आंदोलन छेडले जाईल आणि त्याला कोणी अडवू शकणार नाही असा इशारा देखील यावेळी रेल्वे प्रशासनाला देण्यात आला. यावेळी बोलताना आव्हाड यांनी सांगितले की, समस्त रेल्वे प्रवाशांचे एकच मत आहे ते म्हणजे गर्दीच्या वेळी एसी लोकल असताच कामा नये आणि एसी लोकल तुम्ही साध्या लोकल चालवणार असाल तर चालवा. साध्या लोकल बाजूला काढून त्यांच्या जागी एसी लोकल चालवणे हे आमच्या सर्वसामान्य प्रवाश्यांना मान्य नाही. हे लोकांनाही मान्य नाही आणि मलाही मान्य नसल्याचे आव्हाड म्हणाले. रेल्वे प्रशासनाच्या विरोधात दुपारच्या बारा वाजता देखील एवढे मध्यमवर्गीय एक ठिकाणी जमणे हा रेल्वेला आणि महाराष्ट्र राज्याच्या गृह खात्याला धोक्याचा इशारा आहे. याचा अर्थ लोकांच्या मनात प्रचंड राग आहे. आणि या रागाची ऊर्जा या आंदोलनात उतरेल. भविष्यात असे आंदोलन झाले तर होणारे आंदोलन कोणाच्या हातात राहणार नसल्याचे आव्हाडांनी सांगितले. जर रेल्वे प्रशासन सर्वसामान्यांचं ऐकणार नसेल तर आमच्यासारख्या सर्वसामान्यकडे आंदोलन हा एकच पर्याय आहे. आंदोलनाची तलवार काढावीच लागेल असे आव्हाडांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!