मुंबई – बेळगाव महानगरपालिका निवडणुकीत भाजपने अभूतपूर्व असा विजय मिळवला आहे. भाजपला रोखण्यासाठी शिवसेनेसह अन्य पक्षांनी मोठे प्रयत्न केले मात्र भाजपने विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवत महाराष्ट्र एकीकरण समिती सह सर्वांना अस्मान दाखवले.
बेळगाव महापालिका स्थापन झाल्यापासून महाराष्ट्र एकीकरण समितीची अबाधित असणारी सत्ता या निकालानंतर संपुष्टात आली. भाजपने ३५ जागा मिळवत प्रथमच महापालिकेवर प्रथमच आपला झेंडा लावला आहे. तर आजवर सत्तेत राहणाऱ्या एकीकरण समितीचे या वेळी अवघे चार उमेदवार निवडून आले आहेत. यंदा महाराष्ट्र एकीकरण समितीसह भाजप, काँग्रेस, आप, धर्मनिरपेक्ष जनता दल, एमआयएम यासारखे प्रमुख पक्ष उतरले असल्याने निकाल कसा राहणार याचे कुतूहल होते.
हा पराभव सेनेच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. खासदार संजय राऊत यांनी मराठी अस्मितेचा मुद्दा उपस्थित करत भाजपवर शरसंधान केले आहे. बेळगावात एकीकरण समितीचा पराभव घडवून आणला. भाजपाचे महाराष्ट्रातील पुढारी म्हणतात आमचा भगवा बेळगावर फडकला. मग एक करा.पालिकेच्या पहिल्या सभेत बेळगाव महाराष्ट्रात विलीन करण्याचा ठराव मंजूर करा. महाराष्ट्रात पेढे वाटून आनंद व्यक्त करणारया भाजपाने लगेच ही मागणी करावी. तरच तुमचा भगवा खरा! असं राऊत यांनी म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- शिखर धनव-आयशा मुखर्जी यांचा घटस्फोट; आयशाची भावूक पोस्ट
- ‘तुम्ही मराठी माणसाच्या पाठीत खंजीर खुपसला हे बेळगावलाच नाहीतर अखंड हिंदूस्थानाला समजले आहे’
- राणे आणि शिवसेना पुन्हा आमने-सामने ! ‘मुख्यमंत्र्यांशिवाय चिपी विमानतळाचे उद्घाटन शक्य’
- ब्राह्मण समजाबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्या प्रकरणी छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या वडिलांना अटक
- शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या आजी – माजी आमदारांची महत्वाची बैठक सुरु

