यवतमाळ : राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधिकारी, कर्मचारी व पोलिसांच्या सहकायार्ने परप्रांतातील दारू थेट यवतमाळात पोहोचत असल्याच्या अनेक बातम्या पुढे येत असतानाच आता यवतमाळच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाने यवतमाळमध्ये हरीयाणाची ‘ब्ल्यू व्हिस्की’ पोहोचत असल्याचा प्रकार उघडकीस आणला आहे.
खरं पाहता दारू तस्करीचा हा साम्राज्यवाद म्हणजेच इम्पेरिअँलिझम यवतमाळात बिनधोकपणे सुरू असल्याचे निष्पन्न झाले आहे. यवतमाळच्या राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाचे अधिक्षक सुरेंद्र मनपिया यांच्या मार्गदर्शनात यवतमाळमध्ये हरीयाणातून पोहोचलेली ‘इम्पेरिअल ब्ल्यू व्हिस्की’च्या १00 पेट्या जप्त करण्यात आल्या आहे. साडे सहा लाख रुपयांचे मद्य पोलिसांनी या कारवाईत जप्त केले असले तरी कारवाईत २२ लाख रुपयांचे तीन वाहनांसह एकूण ३0 लाख रुपयांचे साहित्य जप्त केल्याचा डिंगोरा राज्य उत्पादन शुल्क विभाग पिटत आहे.
त्यामुळे मोठी दाखविण्यात आलेली ही कारवाई यापेक्षाही कित्येकपट मोठी व गुंतागुंतीची असल्याच्या चर्चा स्थानिक मद्यसम्राटांमध्ये रंगू लागल्या आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरीक्षक यांच्या भरारी पथकाने ही कारवाई केली. दि. ११ सप्टेंबर रोजी डोर्ली, डोळंबा, नागपूर रोड येथील भाग्यनगरमधील मोर गोडाऊन इस्टेट येथून एका ट्रकमधून हरियाणा राज्यातील विदेशी मद्य दुसऱ्या वाहनामध्ये भरत असल्याचे निदर्शनास आल्याने ही कारवाई केली. याप्रकरणी सहा आरोपींना अटक करण्यात आली असून आरोपींकडून इम्पेरिअल ब्ल्यू व्हिस्की या विदेशी दारुच्या १00 पेट्या जप्त करण्यात आल्या आहेत.
उत्तरप्रदेश येथील ट्रकमधून हरीयाणा येथील दारू महाराष्ट्रातील यवतमाळपर्यंत पोहोचली आहे. एक्साईज विभागाने जप्त केलेल्या वाहनात इम्पेरिअल ब्ल्यू व्हिस्कीच्या १८0 मिलीच्या १00 पेट्या जप्त करण्यात आल्या आहे. सोबतच ८९ हजार १00 रुपयांचे मार्बल पावडर जप्त करण्यात आले आहे. म्हणजेच एकूण ७ लाख ७00 रुपयांचा मद्यसाठा यात आहे.
एकंदरीतच उत्तरप्रदेश राज्यातून पासिंग असलेल्या ट्रकमधून हरीयाणा राज्यात विक्रीस असलेले मद्य यवतमाळात पोहोचत असल्याचे या कारवाईवरुन उघडकीस आले आहे. विशेष म्हणजे २२ लाखांचे तीन वाहने यात जप्त असून दारुसाठा सात लाख ६0 हजार ७00 रुपयांचाच आहे. त्यामुळे या कारवाईबाबत मद्यसम्राटांमध्ये चचेर्ला पेव फुटले असून हरीयाणातील मद्य यवतमाळात यापूवीर्देखील अशाच पद्धतीने मोठ्या प्रमाणात पोहोचत असल्याची शक्यता आहे. याप्रकरणी एक्साईज विभाग काय कारवाई करते, याकडे लक्ष लागले आहे…
महत्वाच्या बातम्या:-
- आरोग्य सेवा कोडमडली असताना प्रशासन ‘जम्बो कोविड रुग्णालया’चे कागदी घोडे नाचवित आहे का?
- परीक्षा पद्धत साधी व सोपी, विद्यार्थ्यांनी टेन्शन घेऊ नये- प्राजक्त तनपुरे
- भाजपाच्या घरातील धुण्यांमध्ये अनेक धुणी डाग पडलेली आहेत, सचिन सावंतांचा देवेंद्र फडणवीसांना टोला
- एकनाथ खडसेंकडे जी काही माहिती आहे त्यांनी ती जनतेसमोर आणावी : सचिन सावंत
- नागपूरकर म्हणतात’आय सपोर्ट तुकाराम मुंढे’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

