Share

“राम-रावणाच्या भूमिकेत रावणाची भूमिका करणाऱ्याने सीतेचं अपहरण केलं असं होत नाही”, शरद पवारांनी केले अमोल कोल्हेंचे समर्थन

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे (NCP MP Amol Kolhe) यांच्या ‘व्हाय आय किल्ड गांधी’ या चित्रपटावरुन आता नवा वाद रंगला आहे. खासदार अमोल कोल्हे यांनी या चित्रपटामध्ये नथुराम गोडसेची भूमिका साकारल्याने त्यांच्यावर सर्वच स्तरातून टीका करण्यात येत आहे. आता हा मुद्दा थेट राष्ट्रवादीच्या भूमिकेचा बनला आहे. भाजपने यावरूनच राष्ट्रवादीने आपली भूमिका स्पष्ट करावी असे म्हटले आहे, आता यासर्व प्रकरणावर स्वतः शरद पवार (Sharad Pawar ) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

गांधी सिनेमा सगळ्या जगात गाजला. त्या सिनेमात सुद्धा नथुराम गोडसेची भूमिका होती. नथुराम गोडसेची भूमिका केली तो कलाकार होता. कलाकार म्हणून कोल्हेंच्या या भूमिकेकडे पाहिलं पाहिजे. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांवरील चित्रपटात औरंगजेबाच्या भूमिकेत जो औरंगजेबाची भूमिका करतो. त्यात तो मुघलांचा समर्थक होत नाही, किंवा राम -रावणाच्या भूमिकेत रावणाची भूमिका करणाऱ्याने सीतेचं अपहरण केलं असं होत नाही. त्यामुळे अमोल कोल्हेंनी जी भूमिका केली ती कलावंत म्हणून केली. त्यांनी कलावंत म्हणून भूमिका केली म्हणजे त्यांची गांधींविरोधात भूमिका आहे असा त्याचा अर्थ नाही. असे म्हणत शरद पवारांनी अमोल कोल्हे यांची बाजू घेतली आहे.

तसेच भाजपच्या टीकेवरही शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. भाजप हे गांधीवादी कधीपासून झाले? भाजपच्या संघ आणि त्यांचा इतिहास सर्वांना माहिती आहे. एक काळ असा होता की गांधींबाबत वेगळी भूमिका घेणाऱ्या ज्या शक्ती होत्या त्या शक्ती सध्या कुठे आहेत बघितलं पाहिजे, त्यावर त्यांनी बोलावं. असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!