🕒 1 min read
सोलापूर : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये त्यांनी अजित पवार आणि पवार कुटुंबीयांवर निशाणा साधला. राज्याचा विविध भागात काही घरे ,इमारती ,शेतजमीन ,साखर कारखाने आहेत. व्हेंचर प्रायवेट लिमिटेड, इंडोपर्स प्रायव्हेट लिमिटेड या दोन कंपन्या कोणाच्या आहेत? तसेच त्या कंपन्यांनी अजित पवार यांना १०० कोटी कधी दिले होते?, असा सवाल त्यांनी शरद पवारांना विचारला आहे.
अजित पवार यांनी इनकम टॅक्सची धाड सुरू झाल्यावर पहिल्या दिवशी विधान केले होते की माझ्या कुटुंबाच्या घरी धाडी कशाला चालू आहेत. परंतु जरंडेश्वर साखर कारखान्यापासून अजित पवार यांच्या ७० बेनामी-नामी संपत्तीपर्यंत त्यांचे कुटुंबीय भागीदार आहेत असे पुरावे माझ्याकडे आहेत, असा धक्कादायक आरोप सोमय्या यांनी यावेळी केला.
तर पुढे ते म्हणाले, सर्व कागदपत्र मी उद्या ईडी आणि इनकम टॅक्स तसेच सहकार मंत्रालय यांना पाठवणार आहे. यातला एक पण कागद खोटा असेल तर पवार कुटुंबीयांनी मला सिद्ध करून दाखवावं असे चॅलेंज यांनी शरद पवार यांना सोमय्या यांनी दिल्याने राजकीय वातावरण चांगलेच पेटले असल्याचे दिसत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- आगामी महापालिका निवडणूकांसंदर्भात गडकरी आणि फडणवीस यांच्यात चर्चा
- ३७० कलम रद्द करुनही काश्मीरप्रश्न सुटलेला नाही- मोहन भागवत
- ‘कारवाई करणार असेल तरच यावं अन्यथा…’; उदयनराजेंचे ईडीला पुन्हा एकदा आव्हान
- कुणी ‘शेण खा’ म्हटलं तर तू खातोस का? शिवसेना आमदारांचा राष्ट्रवादीच्या आमदाराला खोचक सवाल
- मोदींची घोषणा! अयोध्येच्या तीर्थयात्रेसाठी भाजप सरकार ५० हजारांची आर्थिक मदत करणार

