🕒 1 min read
औरंगाबाद : सिडको बसस्थानक येथे जवळपास ४०० ते ५०० कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकार्यांकडे आत्महत्येची परवानगी मागितली आहे. राज्यशासन जर विलिनीकरण करू शकत नसेल तर आम्हाला इच्छामरणाची परवानगी द्या असे निवेदन कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. त्यामुळे आता जीव गेला तरी विलीनीकरणाच्या मागणीवरून आम्ही मागे हटणार नाही. एकीकडे रुजू व्हा म्हणत आहेत तर दुसरीकडे कर्मचाऱ्यांना बडतर्फ केले जात आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात आमच्यावर होणाऱ्या कारवाईला सामोरे जाण्यासाठी आम्ही तयार असल्याचे सिडको बसस्थानक येथे दुखवट्यास बसलेल्या कर्मचाऱ्यांनी सांगितले.
७ नोव्हेंबरपासून एसटी कर्मचाऱ्यांनी संपास सुरुवात केली. सदैव धावणारी लालपरी बंद पडली. आता काही प्रमाणात एसटीच्या फेऱ्या सुरु असल्या तरीही पूर्वीप्रमाणे एसटी कधी धावेल यासाठी प्रवाशांना आणखी प्रतिक्षा करावी लागणार आहे. एसटीचा संप पुकारणाऱ्या संघटनेने मुंबईत संघातून माघार घेतल्याची घोषणा केली असली तरीही राज्यासह मराठवाड्यात अजूनही विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम असलेल्या बहुतांश कर्मचाऱ्यांनी विलीनीकरणाचा हट्ट सोडलेला नाही.
सिडको बस स्थानक येथे दुखवट्यास बसलेले कर्मचारी याआधी चिकलठाणा येथील कार्यशाळेत आंदोलनास बसले होते. मात्र त्याठिकाणी महिला कर्मचाऱ्यांसाठी शौचालयाची व्यवस्था नसल्याने सोयी-सुविधांचा विचार करता सर्व कर्मचारी सिडको बस स्थानक परिसरात स्थलांतरित झाले आहेत. ५ जानेवारी रोजी होणाऱ्या सुनावणीकडे आता सर्व कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे. अॅड. सदावर्ते यांना आम्ही आमचे वकीलपत्र दिलेले आहे. ते जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल. ते आमच्या हिताचाच निर्णय घेतील. विलीनीकरण झाल्यास त्यानंतर आमचा एक महिन्याचा पगार आम्ही स्वखुशीने सदावर्ते यांना देऊ से उद्गार यावेळी सिडको बस स्थानकातील कर्मचार्यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘भारतातही नसीरुद्दीन सारख्या…’, भातखळकरांचा हल्लाबोल
- बुमराहचा खतरनाक यॉर्कर! भारतीय गोलंदाजाचा व्हिडिओ व्हायरल
- “…अशी शैली माजी पंतप्रधानांमध्ये नव्हती”; शरद पवारांनी केले मोदींचे कौतुक
- यूपी योद्धाने गुजरात जायंट्सशी साधली बरोबरी, सामना अनिर्णित
- पंतप्रधान मोदींबाबत शरद पवारांचे मोठे विधान म्हणाले, “यूपीए सरकारमध्ये दुसरा मंत्री नव्हता जो…”


