मुंबई: सामना या वृत्तपत्रातून भाजपाच्या कालच्या हालचालींवर भाष्य केले असून घणाघात देखील करण्यात आला आहे. प्रयत्न करून, जोरजबरदस्ती करून, घोडेबाजारात रान पेटवूनही एखादे सरकार पाडता येत नसेल तर मनाचा असा गोंधळ उडतो, असा टोला देखील भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांना लगावला आहे.
“भाजपची मगरमिठी स्वीकारली तरच राज्याचे हित या भ्रमात राहू नका. विरोधी पक्षाने आक्रमक व्हावे व राज्याच्या हिताच्या प्रश्नांवर सरकारला कोंडीत पकडावे हे योग्यच आहे. विरोधी पक्ष जितका आक्रमक व सावध तितके सरकारचे काम पारदर्शक होत असते. त्यादृष्टीने नड्डा यांनी महाराष्ट्रातील विरोधी पक्षाला दिलेल्या सूचनांचे स्वागत करायलाच हवे. खरे तर नड्डा यांनी हे सांगण्याचीही गरज नव्हती. नड्डा यांनी सांगण्याआधीच विरोधी पक्षांनी आक्रमणाच्या तोफांना बत्ती लावलीच होती, पण बत्ती लावली तरी तोफा निशाणा साधतातच असे नाही.” असा समाचार देखील घेतला आहे.
#साहेब_माझाविठ्ठल: प्रत्येक महत्वाच्या विषयांना पवार साहेबांचा परिसस्पर्श आहे: जितेंद्र आव्हाड
“मध्य प्रदेश आणि राजस्थानातही त्यांनी तोफांच्या नळकांड्यास बत्ती लावली आहे. मध्य प्रदेशचे सरकार पडले, तर राजस्थानचे सरकार सध्या तेथील राज्यपालांच्या बगलेत गुदमरलेले दिसत आहे. बहुमतात असलेली विरोधकांची सरकारे पाडायची ही आक्रमणाची पद्धत आहे. महाराष्ट्रात आक्रमणाचे मार्ग वेगळे आहेत हे सांगायची गरज नाही.” , असा टोला देखील राजस्थानातील भाजपाच्या सद्य स्थितीवर लगावला.
पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसला बसणार धक्का? होऊ शकते पारनेरची पुनरावृत्ती!
“भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नड्डा यांना आडवे जाणारे बालिश वक्तव्य केले. राज्याच्या हितासाठी आजही आम्ही शिवसेनेसोबत एकत्र यायला तयार आहोत. आता हे राज्याचे हित म्हणजे नक्की काय? भाजपला मुख्यमंत्रीपद मिळाले तरच राज्याचे हित, अन्यथा नाही. दुसरे असे की स्वतः फडणवीस, नड्डा वगैरे लोक शिवसेनेला स्वार्थी, अपयशी वगैरे दूषणे देत आहेत. मग शिवसेनेबरोबर जाऊन राज्याचे हित कसे साधणार? पाटील यांनी एक मान्य केले पाहिजे की, राज्यात सध्या जी व्यवस्था सुरु आहे ती शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आहे व ती व्यवस्थाही राज्याच्याच हिताची आहे! “, असा सल्लाही चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर दिला आहे.
गावी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी आता अभिनेता सोनू सूदचा पुढाकार!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

