Share

गावी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी आता अभिनेता सोनू सूदचा पुढाकार!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: कोकण आणि गणेशोत्सव हे समीकरणच आहे. तर, मुंबई, पुण्यासारख्या शहरातून लाखो चाकरमानी हे कोकणात दाखल होत असतात. शिमगा आणि गणेशोत्सव अशा दोन सणांना चाकरमानी न चुकता गावी जाण्यास उत्सुक असतात. यंदा, मात्र कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर या गणेशभक्तांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे दिसून येत आहे.

दरवर्षी, विशेष रेल्वे गाड्या सोडल्या जातात तसेच एसटीतर्फे देखील ज्यादा गाड्या पुरवल्या जातात ज्याचं बुकिंग काही महिन्यांआधीच फुल्ल होत असते. यावेळी शासनाने मात्र असून कोणतीही ठोस नियमावली काढलेली नसून, गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला असूनही जाण्याची सोय कशी होणार हे स्पष्ट केले नसल्याने चाकरमानी चांगलेच गोंधळले आहेत. यानंतर मनसे स्वखर्चातून बसने जायची सोय करणार असल्याचे देखील समजत असून त्यासाठी तयारी सुरु असल्याचे सांगितले जात आहे.

पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसला बसणार धक्का? होऊ शकते पारनेरची पुनरावृत्ती!

तर, स्थलांतरित मजुरांना त्यांच्या घरी पोहोचवण्यासाठी म्हणून सोनूनं जबाबदारीनं पुढं येत अनेकांना सुखरुपपणे त्यांच्या घरी पाठवलं. प्रवासादरम्यान त्यांच्या सुरक्षिततेपासून ते अगदी खाण्यापिण्याच्या सोयीपर्यंत प्रत्येत गोष्टीची त्यानं काळजी घेतली. सर्वत्र आपल्या या नि:स्वार्थ कामानं अनेकांच्या मनात आदराचं स्थान मिळवणाऱ्या या बॉलिवूडकरानं आता पुन्हा एकदा सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

#साहेब_माझाविठ्ठल: प्रत्येक महत्वाच्या विषयांना पवार साहेबांचा परिसस्पर्श आहे: जितेंद्र आव्हाड

अभिनेता सोनू सूद आता कोकणवासीयांसाठी धावून येणार आहे. गावी जाणाऱ्या अनेकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. याच अडचणींमधून मार्ग काढण्यासाठी म्हणून एका व्यक्तीनं सोशल मीडियाचा आधार घेत थेट सोनू सूदशी संपर्क साधला. ‘आमचा सण जवळ येत आहे आणि ट्रॅव्हलर्स सेवा देणारे मुंबईपासून मालवणापर्यंत जाण्यासाठी माणसी ३ हजार रुपये आकारत आहेत. एरव्ही हे दर ५०० रुपये असतात. शिवाय ते ई पाससाठीसुद्धा जास्तीचे ५०० रुपये मागत आहेत. सोनू सूद, तुम्ही आम्हाला गणेशोत्सवासाठी जाण्यास मदत करु शकाल का?’, असा प्रश्न निखिल परब याने केला असता, त्याच्या या ट्विटला उत्तर देत सोनूनं लगेचच मदतीचा हात पुढं केला.

…म्हणून खुद्द मुख्यमंत्री येणार पुणे दौऱ्यावर

कोणालाही कोणत्याही प्रकारे पैसे देण्याची गरज नाही. मला तुमची माहिती पाठवा….गणपती बाप्पा मोरया’, असं लिहित सोनूनं नव्या पद्धतीनं मदत करण्याचा नवीन अध्याय सुरु केला आहे. त्यामुळे परदेशात अडकलेले विद्यार्थी असो, लॉकडाऊनमध्ये अडकलेले मजूर वा गणेशोत्सवासाठी गावी जाणारे चाकरमानी…या सर्वांसाठीच सोनू सूद हा देवदूत ठरतोय यात तीळ मात्र शंका नाही!

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!