Share

पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसला बसणार धक्का? होऊ शकते पारनेरची पुनरावृत्ती!

Published On: 

🕒 1 min read

सांगली: पारनेरमध्ये नगरसेवक फोडाफोडी रंगलेले नाराजीनाट्य सर्वांनीच पाहिले. त्यावेळी शिवसेनेच्या नगरसेवकांची घरवापसी करत राष्ट्रवादीने महाविकास आघाडीचे राज्यातील सरकारमधील वादाचा मुद्दा शमवला. यानंतर, आता गेले अनेक दिवस याचीच पुनरावृत्ती पश्चिम महाराष्ट्रात घडणार असल्याची चर्चा होत असून काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

सांगलीतील काँग्रेस नेत्या आणि माजी मंत्री मदन पाटील यांच्या पत्नी जयश्री पाटील यांच्या संभाव्य राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तर महापालिकेतील राजकीय पटलावर दीर्घकालीन परिणाम होण्याची चिन्ह आहे. तर, गटबाजीतून एकेकाळी अख्ख्या जिल्हाभर विस्तारलेली काँग्रेस आता मर्यादित स्वरूपात भासत असली तरी तळागाळापर्यंत पोहोचलेली मुळे आजही तग धरून आहेत. त्याला योग्य दिशा द्यायची इच्छा मात्र पक्षनेतृत्वाकडे दिसत नसल्यानेच पक्षाची अवस्था केवळ काही घराण्यापुरतीच मर्यादित झाली आहे.

#साहेब_माझाविठ्ठल: प्रत्येक महत्वाच्या विषयांना पवार साहेबांचा परिसस्पर्श आहे: जितेंद्र आव्हाड

एकेकाळी राज्याचे राजकारण घडविणाऱ्या सांगलीत काँग्रेसचा वरचष्मा होता. वसंतदादा पाटील उमेदवारी देतील त्या व्यक्तीला लोकांनी निवडून द्यायचे अशी परंपरा होती. वसंतदादांच्या पश्चात मुख्यमंत्रिपदासाठी ज्यांचे नाव घेतले जायचे ते डॉ. पतंगराव कदम यांनाही बंडखोरी करूनच नेतृत्वासाठी वाटचाल करावी लागली होती. याच बरोबर मदन पाटील यांनाही बंडखोरी करावी लागली होती. यासंदर्भात लोकसत्ताने वृत्त दिले आहे.

…म्हणून खुद्द मुख्यमंत्री येणार पुणे दौऱ्यावर

त्यामुळे, ऐनवेळी बहुमताचा समीकरण बनवत राज्यात उदयास आलेल्या भविष्यावर वारंवार विरोधक जरी प्रश्न निर्माण करत असून, महाविकासआघाडीतीलच अंतर्गत पक्षाच्या स्थानिक राजकारणाचे पडसाद हे राज्य पातळीवर उमटू शकतात यात शंका नाही. पारनेरप्रकरणानंतर नाराज शिवसेनेचे नगरसेवक परत करून राष्ट्रवादीने आघाडी धर्म पाळला असला तरी आता या संभाव्य पक्षप्रवेशाबद्दल काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये बेबनाव होण्यास वेळ लागणार नाही.

आनंदाची बातमी : राज्याने गाठली एका दिवसातील कोरोनामुक्त रुग्णांची आतापर्यंतची सर्वोच्च रेकॉर्डब्रेक संख्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!