Share

मराठ्यांचा इतिहास ब्राह्मणांनी लिहला तर तो चुकीचा ?- राज ठाकरे

Published On: 

🕒 1 min read

वेबटीम : मराठ्यांचा इतिहास ब्राह्मणांनी लिहला किंवा ब्राह्मणांचा इतिहास मराठ्यांनी लिहला तर तो चुकीचा, असा प्रकार आपल्याकडे घडत असल्याची टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. मंगेशकर नाट्यगृहात बाबासाहेब पुरंदरे यांच्या ९५व्या वाढदिवसानिमित्त ‘शिवशाहीर सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी त्यांनी ही टीका केली आहे. या कार्यक्रमाला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही हजेरी लावली होती.

काय म्हणाले राज ठाकरे
मराठ्यांचा इतिहास ब्राह्मणांनी लिहला किंवा ब्राह्मणांचा इतिहास मराठ्यांनी लिहला तर तो चुकीचा, असा प्रकार आपल्याकडे घडत आहे .ज्या माणसाने स्वत:चे संपूर्ण जीवन शिवआख्यान आणि शिवचरित्र लिहण्यात घालवले, त्या बाबासाहेब पुरंदरेंना आज महाराष्ट्रात पोलीस संरक्षण घेऊन फिरावं लागतंय, ही खूप दुर्दैवाची गोष्ट आहे. काही जणांकडून बाबासाहेबांचा उल्लेख श्रीमंत म्हणून केला जातो. पण राजकारणामध्ये येऊन श्रीमंत झालेल्या व्यक्ती बाबासाहेबांवर बोटं उगारत आहेत. पण बाबासाहेबांनी मांडलेल्या इतिहासातील आक्षेपांवर चर्चा करायला कुणीही पुढे येत नाही. कारण त्यांना जातीपातीची लेबलं लावून फक्त आरोप करायचे आहेत.

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!