Share

15 दिवसात आरोप सिद्ध केले तर आमदारकीचा राजीनामा देतो नाहीतर…; रवी राणांचे ठाकूर यांना ओपन चॅलेंज

Published On: 

🕒 1 min read

अमरावती : शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी आर्थिक मदत देण्याच्या मागणीवरुन आमदार रवी राणा आणि पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक सुरु आहे. यानंतर मेळघाटातील आदिवासींची जमीन आमदार रवी राणा यांनी हडपली असल्याचा खळबळजनक आरोप यशोमती ठाकूर यांनी केला होता. त्यानंतर आता आमदार रवी राणा यांनी यशोमती ठाकूर यांना ओपन चॅलेंज दिलं आहे.

जमीन हडपली असल्याचा आरोप करणाऱ्या यशोमती ठाकूर यांना आमदार रवी राणा यांनी खुलं आव्हान दिलं आहे. माझ्यावरील आरोप 15 दिवसात सिद्ध करा आरोप सिद्ध झाल्यास मी आमदारकीचा राजीनामा देतो तर आरोप सिद्ध न झाल्यास तुम्ही मंत्री पदाचा राजीनामा द्या, असं आमदार रवी राणा यांनी म्हंटल आहे.

दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीचा ठराव जिल्हा नियोजन बैठकीमध्ये घेऊ असं आश्वासन पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांनी दिलं होत. मात्र तो ठराव घेतला नाही त्यामुळे शेतकऱ्यांना मदत न मिळाल्यास यशोमती ठाकूर यांचा ताफा अडवून त्यांच्या गाडीची चावी हिसकावून घेईल असे देखील रवी राणा यांनी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!