Share

…म्हणून ही जागा ठेवणं योग्य नाही; बाबुल सुप्रियोंचा खासदारकीचा राजीनामा

Published On: 

नवी दिल्ली : माजी केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो यांनी भाजपच्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे. बाबुल सुप्रियो लोकसभेचे खासदार होते. भाजपमधून बाहेर पडताना आपल्याला खूप वाईट वाटलं असल्याचं सुप्रियोंनी सांगितलं आहे. बाबुल सुप्रिया यांनी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेण्याआधी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

सुप्रयो यांनी राजकारणात संधी दिल्याबद्दल तसंच पक्षात महत्त्वाच्या भूमिका दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि वरिष्ठ नेत्यांचे आभार मानले. भाजपसोबत राजकीय करिअरला सुरुवात केल्याने मी भावूक झालो आहे. मी पंतप्रधान, भाजपाध्यक्ष आणि अमित शाह यांचे आभार मानतो. त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला, असं बाबुल सुप्रियो म्हणाले आहेत.

बाबुल सुप्रियो यांनी गेल्या महिन्यात भाजपला सोडचिठ्ठी देत तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आपण राजकारणातून संन्यास घेत असल्याने खासदारकीचा राजीनामा देणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं होतं. ‘मी पूर्णपणे राजकारण सोडत आहे. जर मी पक्षाचा भाग नसेन तर ही जागा ठेवणं योग्य नाही असा विचार मी केला म्हणून मी खासदारकीचा राजीनामा देत आहे’, असं बाबुल सुप्रियोंनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!