🕒 1 min read
सांगली : भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांना कराड पोलिसांनी ओगलेवाडी येथील रेल्वे स्टेशनवर ताब्यात घेतले. आज मंगळवारी पहाटे साडेचारच्या सुमारास ते कोल्हापूरकडे जात असताना त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांना शासकीय विश्रामगृहाकडे नेण्यात आले. त्यापूर्वी सोमवारी सोमय्या यांच्या मुंबईतील निवासस्थानी मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सोमय्या यांनी कोल्हापुरात दाखल होऊ नये याकरिता राष्ट्रवादी काँग्रेसकडून इशारा देण्यात आला होता. तसेच काही वादग्रस्त वक्तव्येही पदाधिकाऱ्यांनी केले होते.
त्या पार्श्वभूमीवर ‘किरीट सोमय्या यांच्या केसाला जरी धक्का लागला तरी महाविकास आघाडीचं सरकार बरखास्त झालेलं असेल’, असा जाहीर इशाराच माजी मंत्री तथा रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी राज्य सरकारला दिला आहे.
खोत म्हणाले, ‘भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या कोल्हापूरकडे रवाना झाले असताना, त्यांना कोल्हापुरात येण्यापासून रोखायला राष्ट्रवादी पक्षाच्या गुंडांकडून त्यांना खुली धमकी देण्यात येत आहे. महाविकास आघाडी सरकार हे राज्य तुम्ही गुंडांची टोळी म्हणून चालवत आहात काय? महाविकास आघाडी सरकारने लक्षात असू द्यावे की, किरीट सोमय्या यांच्या केसाला जर धक्का लागला तर त्याच क्षणी महाराष्ट्र राज्यामध्ये हे सरकार बरखास्त झालेले असेल’ असा इशारा सदाभाऊंनी दिला.
महत्त्वाच्या बातम्या
- सोमय्यांच्या रडावर आता ठाकरे कुटुंबीय; अलिबागला जाऊन रश्मी ठाकरेंच्या बंगल्यांची पाहणी करणार
- मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करून किरीट सोमाय्यांवर होत असलेली कारवाई थांबवायला हवी होती – फडणवीस
- ‘सोमय्या फक्त साधन, खरे मास्टरमाईंड चंद्रकांत पाटीलच’, हसन मुश्रीफांचा आरोप
- चंद्रकांत पाटलांकडून मला भाजपात येण्यासाठी ऑफर; हसन मुश्रीफांचा गौप्यस्फोट
- कुटुंबांवर केलेले आरोप बिनबुडाचे, सोमय्यांच्या सीए पदवीवरच मला शंका-हसन मुश्रीफ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
