Share

शरद पवारांना मुख्यमंत्री बनवा, आम्ही पाठिंबा देऊ – काँग्रेस

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा – सत्तास्थापनेसाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीसाठी परिस्थिती आता अनुकूल झाली असल्याचे चित्र आहे. तसेच शरद पवार हे मुख्यमंत्री होऊ शकतात असे संकेत अजित पवार यांच्याकडून देण्यात आलेले आहेत. त्यामुळे आघाडी आणि शिवसेना एकत्र येत राज्यात सत्ता स्थापन करणार का ? याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे.

याविषयी कॉंग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी भाष्य केले आहे. शरद पवारांना मुख्यमंत्री बनवलं तर काँग्रेस त्याला पाठिंबा देईल असं ठाकूर यांनी सांगितलं. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांसह कॉंग्रेसचे नेतेही सत्ता स्थापनेसाठी अनुकूल असल्याचे वातावरण तयार होत आहे.

दरम्यान, सत्ता सत्तास्थापानेविषयी चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आज दिल्लीत सोनिया गांधींची भेट घेणार आहेत. या भेटेत ते सत्ता स्थापनेच्या मुद्यावर चर्चा करण्याची दात शक्यता आहे. परंतु शरद पवार यांनी राष्ट्रवादी ही विरोधी पक्षाची भूमिका पार पाडणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे ते आता हा निर्णय बदलणार का याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही आज नवी दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांची भेट घेणार आहेत. भाजपकडून ही भेट ‘राज्यात अवकाळी पावसामुळे ओला दुष्काळ सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे, त्यासाठी केंद्र सरकारने शेतकऱ्य़ांना मदत करावी, यासाठी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. शेतकऱ्यांच्या मदतीनिमित्त ही भेट होत असल्याचे हे फक्त निमित्त आहे. या भेटीत राज्यातील सत्ता स्थापनेवर चर्चा होण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1191212054532636673?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1191209060902699009?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1191207045933854720?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!