🕒 1 min read
मुंबई : ‘मी स्वतः सार्वजनिक कार्यक्रमांवर सध्या बहिष्कार टाकतेय, शासकीय, महापालिकेचे कार्यक्रम वगळता खासगी कार्यक्रम सध्या बंद करतेय. आम्ही सगळ्यांवर लक्ष ठेवणार आहोत. मार्शल जवान हायर करतोय’, असे म्हणत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आजपासून स्वतःच्या सर्व सार्वजनिक कार्यक्रमावर बंदी घातली आहे.
‘दोन तीन दिवस स्वतः आम्ही भेटी देतोय, आज सेवन हिल्स मध्ये ६९३ रुग्ण दाखल आहेत. १ तारखेपासून रुग्ण वाढत आहेत, ही चिंताजनक बाब आहे. यापुढे कुठल्याच सार्वजनिक कार्यक्रमाला न जाण्याचा निर्णय पेडणेकर यांनी घेतला आहे. कोरोनाचं नव्याने वाढलेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर, सोशल डिस्टन्सिंगसाठी पेडणेकर यांनी हे पाऊल उचललं आहे. १ मार्चपासून नगरसेवकांना लस देण्यात येईल, अशी माहितीही किशोरी पेडणेकर यांनी दिलीय.
‘रेल्वेत फिरणाऱ्या मार्शल यांना मुंबई महापालिकेकडून पास दिला जाणार आहे. लग्न आणि समारंभावर लक्ष केंद्रित करणार आहे. आता लक्षणविरहित पॉझिटिव्ह रुग्णाला शिक्के मारले जातील’ असंही पेडणेकर यांनी म्हंटलंय.
महत्वाच्या बातम्या
- पुणेकरांसाठी वाईट बातमी! भारत-इंग्लंड वनडे सामना पुण्यात नव्हे तर ‘या’ शहरात होणार?
- योगगुरु रामदेव बाबा यांचं कोरोना औषधह बाजारात, लॉचिंगला केंद्रीय आरोग्यमंत्री आणि गडकरी
- रायगडावर विद्युत रोषणाईवर अजित पवार म्हणाले, हा उत्साही लोकांचा अजाणतेपणा !
- सरकार आपल्याच आमदारांना घाबरतंय ? फडणवीसांच्या टीकेवर अजितदादांचं रोखठोक उत्तर
- ‘मनात, ह्रदयात अखंड शिवरायांचे स्थान, त्यांना वंदन करण्यासाठी शिवजयंतीची गरज नाही’


