Share

जर युपीत दंगली झाल्या तर हिंदू मरेल, मग मुस्लीम सुरक्षित राहतील का?-योगी आदित्यनाथ

Published On: 

लखनऊ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज दि. ४ऑगस्ट, बुधवारी गोरखपूरमधील एका कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी त्यांनी ‘लाईव्ह हिंदूस्तान’च्या शशी शेखर यांच्याशी संवाद साधला. मुलाखती दरम्यान योगींनी उत्तर प्रदेशातील हिंदू-मुस्लीम दंगलींवर भाष्य केले.

ते म्हणाले की, गेल्या दोन वर्षांच्या काळात मला अनेक धर्माच्या लोकांना भेटण्याचा योग आला. विविध लोकांनी मला बोलावले. मी त्यांचे म्हणणे शांतपणे ऐकूण घेतो. चांगले बोलतात ते. आज राज्यातील प्रत्येक व्यक्ती मान्य करेल की दंगली होत नाहीयेत. दंगली झाल्या तर हिंदू मरेल मग मुसलमान सुरक्षित राहील का. एक गट मरेल तर दुसऱ्यालाही त्याची झळ बसेल. एक गट सुरक्षित असेल तर दुसरा गट देखील सुरक्षित राहील असे म्हणत त्यांनी सर्वांना शांतता पाळण्याचे आवाहन केले.

राम आपले पूर्वज आहेत. मी हे म्हणत नाहीये, जगातील सर्वात मोठी मुस्लीम लोकसंख्या असलेल्या इंडोनेशिया आपले पूर्वज रामाला मानतो. इंडोनेशियात मुस्लिम देखील रामलीला करतात. आपण कोणत्या युगात जगत आहोत. राम आपले पूर्वज असल्याचा आपल्याला अभिमान असायला हवा. आपल्याला गर्व वाटायला हवे. इंडोनेशियाला यावर गौरव वाटत असेल तर आपल्याला का वाटू शकत नाही. रामाशी आपला संबंध असल्याचा आपल्याला अभिमान असायला हवा. जर काहींना असे वाटत नसेल तर मला त्यांच्या डीएनएवर शंका येते असेही योगी म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!