🕒 1 min read
मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे MNS) यांच्या चित्रपट शाखेने बॉलीवूड (Bollywood) मधील काही निर्मात्यांना खुली धमकी दिली आहे. पाकिस्तानमधील कुठल्याही कलाकाराला कामावर ठेवू नये. मनसे पाकिस्तानी कलाकारांविरोधात नेहमी आक्रमक भूमिका घेत असते. त्याचबरोबर बॉलीवूड चित्रपटांमध्ये पाकिस्तान अभिनेत्यांना काम करण्यास मनसे नेहमी विरोध करत असते, असे मनसेने म्हटले आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी देखील 2021 मध्ये एका भाषणामध्ये सांगितले होते की, पाकिस्तानी कलाकारांना भारतामध्ये काम देऊ नये. दरम्यान मनसे उपाध्यक्ष आणि मनसे चित्रपट कर्मचारी सेना अध्यक्ष अमेय खोपकर (Amey Khopkar) यांनी बॉलीवूडला ट्विट करत याबद्दल इशारा दिला आहे. या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, ” बॉलीवूड मधील काही निर्मात्यांना पुन्हा एकदा पाकिस्तानी कलाकारांचा पुळका आल्याचे कानावर येत आहे. ही नीच प्रकृती वेळोवेळी ठेचावीच लागते, म्हणूनच पुन्हा एकदा आम्ही स्पष्ट शब्दात इशारा देतोय की फक्त मुंबईच का हिंदुस्थानातील कोणत्याही भाषेतल्या कलाकृतीला पाकिस्तान कलाकार दिसला तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील.”
— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) November 16, 2022
यापूर्वी ही 2019 मध्ये ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशन तर्फे पुलवामा आतंकी हमला झाल्यानंतर भारतामध्ये पाकिस्तानी कलाकारांना पूर्णपणे प्रतिबंध लावण्याची घोषणा केली होती.
जम्मू काश्मीर मधील पुलवामा येथे 14 फेब्रुवारी रोजी आतंकी हमला झाला होता. यामध्ये सीआरपीएफ च्या 40 जवानांना आपल्या प्राण्यांची आहुती द्यावी लागली होती. या घटनेनंतर भारतामध्ये पाकिस्तानी कलाकारांना पूर्णपणे प्रतिबंध लावावे अशी घोषणा करण्यात आली होती. या घोषणेनंतर पण एखादी संघटनेने पाकिस्तानी कलाकारांना काम करण्याची संधी दिलीच, तर त्या संघटनेवर कठोर कारवाई करण्यात येईल असे देखील सांगितले होते.
महत्वाच्या बातम्या
- Sanjay Raut | “हातातले खंजीर बाजूला ठेवा आणि…”; संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंवर निशाणा
- Sushma Andhare | “…त्यांच्या भात्या मधील शेवटचे शस्त्र म्हणजे ‘तुझा बाप’”, सुषमा अंधारेंच्या मुलीला आणखीन एक पत्र
- IPL 2023 | धोनी vs जडेजा वाद सुरू असताना, जडेजाची ‘ती’ पोस्ट झाली व्हायरल
- Vinayak Mete | CID कडून विनायक मेटे अपघात प्रकरणात मोठी अपडेट, चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
- IPL 2023 | बिलिंग्ज आणि कमिन्सनंतर KKR ला आणखी एक झटका, ‘या’ खेळाडूने घेतला आयपीएल न खेळण्याचा निर्णय
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

