🕒 1 min read
चंदीगड : उत्तर प्रदेशातील चार शेतकरी आणि चार भाजप कार्यकर्त्यांचा समावेश आहे. या प्रकरणी मिश्रा यांनी आता स्पष्टीकरण दिले आहे. ‘या संपूर्ण प्रकरणाला राजकीय रंग दिला जात आहे. याबाबत मी मुख्यमंत्र्यांशी बोललो आहे. घटना घडली त्यावेळी मी उपस्थित नव्हतो. पंरुत, मी तेथील व्हिडीओ पाहिले आहेत. भाजप कार्यकर्त्यांवर हल्ला करण्यात आला होता. माझ्या मुलाविरुद्ध केलेले सर्व आरोप निराधार आहेत. तो तिथे उपस्थित नव्हता. तो तिथे हजर असता तर आज तो जिवंत नसता’, असं म्हणत अजय मिश्रांनी आपला मुलगा निर्दोष असल्याचं सांगितलं आहे.
मिश्रा यांचा मुलगा आशिष याने शेतकरी आंदोलकांना रिव्हॉल्वर दाखवून गोळ्या घालण्याची धमकी दिल्याचाही आरोप होत आहे. यावर अजय मिश्रा म्हणाले की, माझ्या मुलाकडे रिव्हॉल्वर असेल तर त्याचा परवानाही असेल. या घटनेत समाजवादी पक्षाचे नेते आणि खलिस्तानी शक्तींचा हात आहे. या संपूर्ण प्रकरणाला राजकीय वळण देण्यात आले आहे. देशातील 99 टक्के शेतकऱ्यांचा कृषी कायद्यांना पाठिंबा आहे. त्यांचे आंदोलन बंद पडू लागले त्यामुळे ते अशा प्रकारच्या घटना घडवत आहेत.
केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांच्या विरोधात गेली वर्षभरापासून शेतकरी शांततामय मार्गाने आंदोलन करीत आहेत. काल लखीमपूर खिरी येथे केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा आणि उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य हे आले होते. त्यावेळी केंद्रीय गृहराज्य मंत्री मिश्रा यांचा मुलगा आशिष आणि आंदोलक शेतकऱ्यांमध्ये बाचाबाची झाली होती. याचवेळी ही घटना घडली होती. यात 4 शेतकरी आणि 4 भाजप कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला आहे.
महत्वाच्या बातम्या
- उत्तर प्रदेशमध्ये आंदोलनाला हिंसक वळण; जिप्सी जाळली, अखिलेश पोलिसांच्या ताब्यात
- घरी जा, गुगलवर ‘टरबूज ऑफ महाराष्ट्र’ सर्च करा; खडसेंनी कार्यकर्त्यांना सांगितले काम
- ‘शेतकऱ्यांना काठीचीच भाषा कळते, लाठ्या-काठ्या उचला, अन् जशास तसे उत्तर द्या’
- ‘शेतकऱ्यांना चिरडणं ही भाजपची ‘पॉलिसी’ आहे का?, त्यांना असं चिरडणं म्हणजे ब्रिटीशी वागणूक’
- तेही म्हणत असतील कारखान्याला माझे नाव देऊन वाट लावली- अजित पवार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
