मुंबई: सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरण आता वेगळे वळण घेताना दिसत आहे. तर, मुंबई पोलीस आणि बिहार पोलीस यांच्यातच आरोप-प्रत्यारोप होत आहेत. बिहार पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी, ‘ महाराष्ट्र सरकारला जर मुंबई पोलिसांवर गर्वच असेल, तर त्यांनी ५० दिवसांत काय केलं?’ असं विचारत आव्हानच दिलं आहे.
बिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी मुंबई पोलिसांच्या सुशांत सिंह राजपूत प्रकरणाच्या तपासावरचं गंभीर प्रश्नचिन्ह उभारले आहेत. त्यांनी, “महाराष्ट्र पोलिसांना इतकाच गर्व असेल. तर मुंबई पोलिसांनी सुशांतच्या आत्महत्या प्रकरणी 50 दिवसांत काय केलं? काय चौकशी केली, हे सांगावं. महाराष्ट्राचे गृहसचिव फोन उचलत नाहीत, बिहार पोलिसांचे फोनही घेत नाहीत. पूर्ण संवाद मुंबई पोलिसांनी थांबवला आहे” असा आरोप पांडे यांनी केला. त्यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना ही प्रतिक्रिया दिली आहे.
अयोध्या निकाल तथ्यावर आधारित नसून भावनांवर देण्यात आला; प्रकाश आंबेडकरांचा दावा
तसेच, “सुशांत सिंह राजपूतला न्याय देणार. तपासासाठी मुंबईला आलेले पाटणा शहराचे एसपी विनय तिवारी यांना विलगीकरण का ठेवलं? एअरपोर्टवर इतके जण येतात, त्यांना विलगीकरणात ठेवलं जातं का? लोकांच्या मनातील शंका दूर करा” असेही गुप्तेश्वर पांडे म्हणाले. काही दिवसांपूर्वी सुशांतच्या वडिलांनी रिया चक्रवर्ती विरोधात बिहार पोलिसांकडे तक्रार नोंदवली होती. यानंतर तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपासासाठी बिहार पोलीसांचे एक पथक मुंबईला आले होते. यावेळी मुंबई पोलीस व सरकार सहकार्य करत नसल्याचे आरोप बिहार पोलीसांनी केले होते.
मान्सून अलर्ट: मुंबई महापालिकेने केले ‘हे’ आवाहन
दरम्यान, या प्रकरणी बॉलिवूडमधील अनेक बढया व्यक्तींची नावे समोर येत असल्याने, मुंबई पोलिसांवर दबाव निर्माण केले जात असल्याचे आरोप भाजपासह अन्य अनेक नेत्यांनी लावले होते. त्यामुळे याप्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी देखील केली जात आहे. राष्ट्रवादीचे युवा नेते पार्थ पवार यांनी याबाबत राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी चर्चा करून निवेदन देखील दिले होते.
सामना अग्रलेख: शहा रुग्णालयात असले तरी गेहलोत यांनी खुश व्हायचे कारण नाही
तर, भाजपाचे केंद्रीय नेते व खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून सीबीआय चौकशीची मागणी केली होती, ज्याची दखल देखील मोदींनी घेतल्याचे समजते. तसेच, भाजपाच्या बिहारसह महाराष्ट्रातील नेत्यांनी देखील हीच मागणी केली असली तरी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व अनिल देशमुख यांनी या प्रकरणात योग्य तो तपास व कारवाई करण्यास मुंबई पोलीस सक्षम असल्याचे सांगितले होते.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

