Share

मला राजकारण करायचं असतं तर आज तीनही राणे जेलमध्ये असते : दीपक केसरकर

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : मुंबई-गोवा महामार्गावरीत खड्ड्यांमुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत होते. या विरोधात नितेश राणे यांनी उप-अभियंत्याला गडनदी पुलावर बांधून त्यांच्या डोक्यावर चिखलाचे पाणी टाकत आंदोलन केले होते. यामुळे त्यांना ९ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तसेच नितेश राणेंवर गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या आदेशावरुन कारवाई होत असल्याचा आरोप होत आहे. याला केसरकर यांनी उत्तर दिले आहे.

केसरकर यांनी ‘नितेश राणे यांनी जे कृत्य केलं, ते सत्कर्म होतं का? व्हिडीओ अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलाय. राणेंवर कारवाई करायला मी कोण आहे? कारवाईसाठी न्यायालयाचेच आदेश आहेत, असं स्पष्ट केले. तसेच राणेंवर गुंडगिरी, खंडणीचे गुन्हे आहेत. चिंटू शेख प्रकरण आहे. मला राजकारण करायचं असतं तर राणेंच्या केसेसचा फॉलोअप केला असता आणि सर्व राणे आज जेलमध्ये गेले असते, असंही दीपक केसरकर म्हणाले.

दरम्यान, केसेकर यांनी पुढे बोलताना उपअभियंते शेडेकर यांना अपमानित करण्याचा अधिकार यांना कुणी दिला? त्यांनी आत्महत्या केली असती तर पुढे काय झालं असतं? तुम्ही कामातल्या चुका दाखवा, आम्ही अभियंत्यांना सस्पेंड करु अस केसरकर म्हणाले आहेत.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!