मुंबई:- शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांची सक्तवसुली संचलनालयाकडून (ED) आज पुन्हा चौकशी होणार आहे. ईडीने वर्षा राऊत यांना नवे समन्स पाठवले होते. त्यानुसार वर्षा राऊत यांना आज पुन्हा एकदा चौकशीला सामोरे जावे लागणार आहे.
दरम्यान, वर्षा राऊत यांच्यावर केलेले आरोप सिद्ध केले नाहीत, तर आरोप करणाऱ्यांना ईडीच्या कार्यालयासमोर जोड्यानं मारू असं स्फोटक वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. संजय राऊत यांनी एबीपी माझाला एक्स्क्लुझिव्ह मुलाखत दिली त्यावेळी ते बोलत होते.
ज्या पद्दतीनं ही मंडळी अफाट, बेफाट, तोंडफाट आरोप करत सुटले आहेत. त्यातून काही निष्पन्न होणार नाही. काहीही कागदं फडकावतात आणि आरोप करतात. आमदार प्रताप सरनाईक यांच्याबाबत अनेक आरोप केले. त्यानंतर काल राज्यातील प्रमुख नेत्यांबाबत, तसेच मी आणि माझ्या कुटुंबियांवरही आरोप केले. यांच्यात हिंमत असेल तर यांनी हे आरोप सिद्ध करुन दाखवावे. नाहीतर मी अब्रुनुकसानीचे खटले वैगैरे ठीक आहे, ते न्यायालयात जाईल. पण हे आरोप तुम्ही सिद्ध करु शकला नाहीत, तर ईडीच्या कार्यालयासमोर या आरोप करणाऱ्यांना जोड्याने मारलं नाही, तर माझं नाव संजय राऊत नाही. हे मी आधीच सांगितलं आहे. असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.
महत्वाच्या बातम्या
- आंदोलक शेतकऱ्यांकडून चिकन बिर्याणी खाऊन ‘बर्ड फ्लू’ पसरवण्याचं षडयंत्र; भाजप आमदाराने तोडले अकलेचे तारे
- राज ठाकरेंची सुरक्षा कमी करणाऱ्या ठाकरे सरकार वरून सरदेसाईंवर झाले मेहरबान
- जनता जर महाविकास आघाडीने त्रस्त असेल तर हल्ला होऊ शकतो; भाजप प्रवक्त्याने वर्तविली शक्यता
- भारतीय चाहत्यांसह सेहवागनेही केलं ट्विटरवर रिकी पाँटिंगला ट्रोल
- सरकारला माघार घ्यावीच लागेल, आम्ही रिकाम्या हाती जाणार नाही; शेतकऱ्यांचा पुन्हा एल्गार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

