🕒 1 min read
औरंगाबाद : कोरोना संकटामुळे बंद असलेली असलेली इंडिगो सेवा पुन्हा एकदा सुरु करण्यात आली आहे. तसेच आता या विमानाचे दररोज उड्डाण होणार आहे. इंडिगोकडून दिल्लीसाठी विमान सुरू झाले होते. त्यानंतर ५ जूनपासून दिल्ली-औरंगाबाद -दिल्ली हे विमान सोमवारी सुरू करण्यात आले. मात्र आता दररोज विमानाचे उड्डाण होणार असल्याने विमान प्रवाशांच्या सुविधेत मोठी भर पडली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवरही आठवड्यातून पाच दिवस एअर इंडियाची मुंबई -औरंगाबाद -दिल्ली आणि दिल्ली- औरंगाबाद-मुंबई विमानसेवा प्रवाशांसाठी उपलब्ध होती. दरम्यान गेल्या काही दिवसात विमानाने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. तसेच कोरोना बाधितांची संख्या ही आता कमी झाली आहे. त्यामुळे एअर इंडियाचे दिल्ली आणि मुंबई विमानसेवा आता आठवड्याचे सातही दिवस उडाण घेणार आहे. अशी माहिती औरंगाबाद टुरिझम डेव्हलपमेंट फाऊंडेशन कमिटीचे अध्यक्ष सुनील कोठारी यांनी दिली.
तर इंडिगो विमान दिल्लीसाठी सुरू करण्यात आले होते. त्यामुळे सध्या साडेचार ते पाच हजार रुपयांमध्ये औरंगाबाद ते दिल्ली असा प्रवास होणार आहे. दिल्ली-औरंगाबाद-दिल्ली हे विमान आठवड्यातील तीन दिवस चालवण्यात येत होते. सोमवार बुधवार आणि शुक्रवार हे विमान सुरु होते. मात्र प्रवाशांच्या वाढत्या प्रतिसादामुळे आता आठवड्याचे सातही दिवस औरंगाबाद दिल्ली विमानसेवा सुरू राहणार असल्याचे विमानतळ प्राधिकरणाने स्पष्ट केले आहेे.
महत्त्वाच्या बातम्या
- नवीन पाणीपुरवठा योजनेसाठी औरंगाबाद पालिकेचा आता समांतरच्या निधीवर डोळा!
- ‘ऊसतोड कामगारांना २० कोटींचा निधी म्हणजे वाझोंटी मदत’, आ.धस यांची टीका
- बदलापूर वक्फ मिळकती प्रकरणात शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांवर सुध्दा गुन्हा दाखल करण्यात यावा – खासदार इम्तियाज जलील
- सुप्रिया सुळेंनी घेतली कोरोनामुळे माता-पित्याचं छत्र हरपलेल्या दोन मुलींची जबाबदारी !
- शिक्षण थांबू देणार नाही…सुनिल शेळकेंकडून फी सवलतीसाठी ‘इतक्या’ लाखांचे अर्थसहाय्य


