🕒 1 min read
नवी दिल्ली : नुकताच मोदी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पार पडला आहे. यात कॅबिनेटसह राज्यमंत्री दर्जाच्या मंत्रिपदाच्या भाजपसह एनडीएतील मित्र पक्षाच्या नेत्यांनी शपथ घेतली. तर, दिग्गज मंत्र्यांकडून कार्यभार काढून घेत त्यांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आला आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे निकटवर्तीय आणि ऐतिहासिक घराण्याचा वारसा असलेले ज्योतिरादित्य शिंदे यांनी मार्च २०२० मध्ये भाजपात जात काँग्रेसला मोठा झटका दिला होता. शिंदेंना भाजपमध्ये मोठी जबाबदारी मिळणार होती हे निश्चित होतं. त्यानुसार त्यांच्याकडे केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाचा कारभार सोपवला आहे.
आता ज्योतिरादित्य शिंदे यांनी मध्य प्रदेशसाठी मोठं गिफ्ट दिलं आहे. मध्य प्रदेशमधून देशातील शहरांमध्ये हवाई वाहतूक सुरु करण्याचा निर्णय शिंदेंनी घेतला आहे. छोट्या शहरांना हवाई मार्गानं जोडण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या UDAN योजनेअंतर्गत ८ नव्या हवाईमार्गांची घोषणा ज्योतिरादित्य शिंदे यांनी केली आहे.
2/2
प्रधानमंत्री श्री @narendramodi जी के कुशल नेतृत्व में @MoCA_GoI #UDAN को नई ऊंचाइयों की ओर अग्रसर करने के लिए पूरी तरह से संकल्पित है!
— Jyotiraditya M. Scindia (@JM_Scindia) July 11, 2021
ग्वाल्हेर-अहमदाबाद, सूरत-जबलपूर, ग्वाल्हेर-पुणे, ग्वाल्हेर-मुंबई या नव्या हवाईमार्गांचा यात समावेश आहे. येत्या १६ जुलैपासून या नव्या मार्गांवर विमान प्रवास सुरू होणार आहे. मध्य प्रदेश मधून इतर राज्यातील शहरांना जोडण्यासाठी याचा फायदा होणार असून राज्यातील पुणे आणि मुंबई या शहरांचा यात समावेश आहे. यामुळे व्यवसायिकांसह पर्यटकांना याचा फायदा होणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- नवीन पाणीपुरवठा योजनेसाठी औरंगाबाद पालिकेचा आता समांतरच्या निधीवर डोळा!
- होशियार… अमित शहा येत आहेत दार खिडक्या बंद ठेवा !
- बदलापूर वक्फ मिळकती प्रकरणात शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांवर सुध्दा गुन्हा दाखल करण्यात यावा – खासदार इम्तियाज जलील
- सुप्रिया सुळेंनी घेतली कोरोनामुळे माता-पित्याचं छत्र हरपलेल्या दोन मुलींची जबाबदारी !
- शिक्षण थांबू देणार नाही…सुनिल शेळकेंकडून फी सवलतीसाठी ‘इतक्या’ लाखांचे अर्थसहाय्य
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

