मुंबई : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने डिपार्टमेंट ऑफ कम्युनिकेशन स्टडिज आणि डिपार्टमेंट ऑफ कम्युनिकेशन अँड जर्नलिझम या दोन विभागांचे विलीनीकरण करून डिपार्टमेंट ऑफ कम्युनिकेशन, जर्नलिझम अँड मीडिया स्टडीज असा नवीन विभाग प्रस्तावित केला आहे. त्यामुळे ऐतिहासिक रानडे इन्स्टिट्यूटचे स्वतंत्र अस्तित्व संपुष्टात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दोन विभागांच्या विलीनीकरण करण्याच्या विद्यापीठाच्या निर्णयाला माजी विद्यार्थी आणि विद्यार्थी संघटनांकडून विरोध होतोय.
यासाठी सेव्ह रानडे इन्स्टिट्यूट नावाची मोहीम देखील चालवली जात आहे. दरम्यान या संपूर्ण प्रकरणावर उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया आली आहे. रानडे इन्स्टिट्यूटच्या स्थलांतराबाबत अनेकांनी विरोध दर्शवल्यानंतर आता राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनीही रानडे इन्स्टिट्यूटच्या स्थलांतराबाबत महत्वाचं वक्तव्य केलं आहे, ती बीडमध्ये बोलत होते.
रानडे इन्स्टिट्यूट दुसरीकडे स्थलांतरीत करून तेथील जागा कुण्या बिल्डरला देण्याचा प्रयत्न होत असेल तर तो प्रयत्न मी एक मंत्री म्हणून हाणून पाडेल, असं उदय सामंत यांनी बीडमधील पत्रकार परिषदत बोलताना सांगितलं आहे. फर्गसन कॉलेज रस्त्यावरील रानडे इन्स्टिट्यूटच्या जागेची आजच्या बाजारभावानूसार किंमत 400 कोटी इतकी असल्याचं सांगितलं जात आहे. अशातच रानडे इन्स्टिट्यूट स्थलांतर करून ती जागा एका बिल्डरच्या घशात घालण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा खळबळजनक आरोप विद्यार्थी कृती समितीने केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- नागपंचमी नव्हे हि तर जुगाऱ्यांची ‘पत्ते पंचमी’! याच दिवशी शिऊरला सर्रास भरता पत्त्यांचे डाव
- ‘चिक्की घोटाळ्यात अजून गुन्हा का दाखल केला नाही?’, हायकोर्टाचा राज्य सरकारला सवाल
- ‘पुरुषोत्तम खेडेकरांनी मनाला वाटेल ते लिहिल्यामुळे मराठ्यांची डोकी भडकली!’
- ‘शरद पवारांनी राष्ट्रवादी स्थापन केल्यानंतर महाराष्ट्रात जातीयवाद वाढला’, राज ठाकरेंचा गंभीर आरोप
- शाळांच्या १५ टक्के शुल्क कपातीचा जीआर जारी, जाणून घ्या सविस्तर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

