Share

‘स्वातंत्र्य ‘भीक’ असेल तर सावरकरांना ‘भिक्षावीर’ म्हणावं का?’

Published On: 

पुणे: देशाला १९४७ साली मिळालेलं स्वातंत्र्य ही भीक होती आणि खरं स्वातंत्र्य २०१४ साली मिळाल्याचं वक्तव्य अभिनेत्री कंगना राणावतने केल्यानंतर देशात मोठी खळबळ माजली. तिच्या या वक्तव्याला ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी देखील पाठिंबा दर्शवला. त्यामुळे आता त्यांच्यावर सुद्धा टीका करण्यात येत आहे. अशातच ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले यांनी या वकतव्यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. त्याच सोबत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील त्यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे.

पुण्यात संविधानिक राष्ट्रवाद मंचाच्या उद्घाटनानंतर निरंजन टकले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. हा आयडिया ऑफ इंडिया बदलण्याचा प्रकार आहे. तसेच हा न्यूनगंडातून आलेला उर्मटपणा आहे. हा एक प्रकारचा मानसिक आजार देखील आहे. सावरकरांना विक्रम गोखले तरी स्वातंत्र्यवीर म्हणतात ना तर मग उद्यापासून विक्रम गोखले सावरकरांना भिक्षावीर म्हणणार आहेत का, जे स्वातंत्र्य मिळालं ते जर भीक असेल तर सावरकरांना भिक्षावीर म्हणावं का, असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलंय की, ही विधानं निरर्थक असली तरीही यामागे एक राजकारण दडलेलं आहे. अशी विधाने करणाऱ्यांना राजाश्रय आहे. याशिवाय, त्यांना अशी विधाने करणं शक्य झालं नसतं. हे फॅसिस्ट राजवट आणण्याचे नियोजन असल्याचे ते यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!