Share

‘मुलीला पुन्हा घरात घेऊ नका’, चिठ्ठी लिहित हतबल बापाने घेतली रेल्वेपुढे उडी..

Published On: 

औरंगाबाद : लाडक्या लेकीचे लग्न काही दिवसांवर येऊन ठेपले होते. घरात लग्नाची जोरदार तयारी सुरु होती. आणि अशातच मुलगी घरातून पळून गेली. यामुळे बसलेला धक्का, झालेला मानसिक आघात आणि बदनामीची भिती यातून हतबल झालेल्या बापाने अखेर रेल्वे खाली जीव देत मृत्यूला कवटाळले. बापाने आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठीत मुलीला पुन्हा घरात घेऊ नका असे लिहून ठेवल्याने सर्वत्र एकच हळहळ व्यक्त केली जात आहे.

वाहनचालक असलेल्या ४८ वर्षीय संजय खंडूजी वाडेकर (वय ४५) असे आत्महत्या केलेल्या गृहस्थाचे नाव आहे. या गृहस्थाच्या घरात १९ नोव्हेंबर रोजी मुलीचे लग्न ठरले होते. मात्र मुलीचे दुसऱ्याच मुलावर प्रेम होते, याची माहिती वडिलांना नव्हती. ते मुलीचे लग्न थाटा-माटात करण्याच्या तयारीत होते. सर्व नातेवाईकांना आमंत्रणे गेली, हॉल, केटरिंगची व्यवस्थाही झाली होती. मात्र, दोन दिवसांपूर्वी मुलगी घर सोडून निघून गेली. खूप शोधाशोध केल्यानंतर हताश वडिलांनी सातारा पोलीस ठाण्यात मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली.

ऐन लग्न तोंडावर आल्यावर मुलीने उचललेल्या पावलामुळे संपूर्ण कुटुंब तणावाखाली होते. हा धक्का सहन न झाल्याने बापाने शनिवारी रात्री थेट संग्रामनगर उड्डाणपुलाखालील रेल्वे रुळावर झोकून देत आत्महत्या केली. जवाहरनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संतोष पाटील यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी उड्डाण पुलाजवळ धाव घेतली. मृताच्या पँटच्या खिशात त्यांचा एक चिठ्ठी सापडली. त्यात त्यांनी पत्नीला उद्देशून लिहिले होते, ‘मी जग सोडून जात आहे. माझ्या मृत्यूनंतर मुलीला कधीही आपल्या घरात प्रवेश देऊ नको. माझ्या मुलाचे लग्न चांगले लाव. तू कायम आठवणीत राहशील, मात्र त्या मुलीला घरात घेऊ नका’. या मजकुराखाली सदर व्यक्तीने सही केली होती.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!