Share

स्वत:वर फुले उधळून झाली असेल तर शेतकऱ्यांना मदत करा, विनायक मेटे यांचे आवाहन

Published On: 

बीड : अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. तरी देखील राज्य सरकार पंचनाम्याचा फार्स आवळत आहे. तसे न करता, शेतकऱ्यांना सरसकट मदत करण्याची मागणी विनायक मेटे यांनी केली आहे. त्यांनी बीड जिल्ह्यातील केज आणि अंबाजोगाई परिसरातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. या वेळी त्यांनी राज्य सरकारला शेतकऱ्यांना मदत देण्याचे आवाहन केले आहे.

राज्य सरकारच्या वतीने पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. मात्र, नुकसान प्रचंड प्रमाणात झाले असून सरसकट मदत देण्याची मागणी मेटे यांनी केली आहे. या दरम्यान त्यांनी राष्ट्रवादीच्या संवाद यात्रेवरही टीका केली. या यात्रेमध्ये स्वत:वर फुले उधळून घेण्यासाठी लाखो रुपये खर्च करण्यात आले. मात्र, शेतकऱ्यांना मदत दिली जात नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. सरकारने शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्याची मागणीही त्यांनी केली.

या दौऱ्यात त्यांच्यासोबत जिल्हा परिषद सदस्या योगिनी थोरात, युवक जिल्हाध्यक्ष रामहरी मेटे, केज तालुकाध्यक्ष केशव कदम, ज्येष्ठ नेते लिंबराज वाघ, महिला आघाडीच्या जिल्हा सरचिटणीस साक्षी हांगे, चंद्रकांत शिंदे आदी उपस्थित होते. मराठवाड्यातच नाही तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करण्याची मागणी त्यांनी केली.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!