Share

‘पूरग्रस्तांना मदत न दिल्यास जलसमाधी घेणार,’ राजू शेट्टींचा इशारा

Published On: 

कोल्हापूर: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी जुलै मध्ये आलेल्या महापुराला महिना झाला असून अजूनही शासनाने पूरग्रस्तांना मदत केलेली नाही. त्यामुळे शासनाने मदत न पुरविल्यास जलसमाधी घेणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

दरम्यान राजू शेट्टी यांनी श्री. क्षेत्र प्रयाग चिखली दक्षिण काशी येथे श्री गुरूदेव दत्तांना अभिषेक घालून प्रयाग चिखली ते नृसींहवाडी पुरग्रस्त शेतकऱ्यांच्या आक्रोश मोर्चेच्या पदयात्रेस सुरुवात केली आहे. यादरम्यान त्यांनी राज्य शासनाला जलसमाधीचा इशारा दिला आहे.

तसेच त्यांनी पंचगंगा परिक्रमा आंदोलन सुरू केले आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यांमध्ये जुलै मध्ये महापूर आला. यामध्ये शेती,घरे, दुकाने यांची अतोनात हानी झाली. मात्र २०१९ च्या तुलनेत यावर्षी अत्यंत कमी मदत शासनाने केली आहे. त्यामुळे त्यासालची मदत शासनाने पुरवावी यासाठी राजू शेट्टी यांनी आंदोलन छेडले आहे. दरम्यान यावेळी त्यांनी ‘राज्य सरकारने निर्णय नाही बदलला तर चिखलीतून नरसोबावाडीच्या दिशेने जाऊन सामूहिक जलसमाधी घेणार’ असा इशारा दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!