🕒 1 min read
पुणे : राज्यात कोरोनामुळे बनलेली भीषण परिस्थिती आता हळूहळू पूर्वपदावर येत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी जनतेशी संवाद साधला. प्रदूषणामुळे कोरोनाचा संसर्ग वाढतो. त्यामुळे प्रदूषण करणारे फटाके टाळा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला केले आहे.
ठाकरेंनी फटाक्यांवर पूर्णपणे बंदी घालणार नसल्याचं सांगितलं असलं तरी सार्वजनिक ठिकाणी फटाके वाजवणं टाळावं असं आवाहन त्यांनी केलं आहे. कोरोनाचं संकट अजूनही कायम असून दुसरी लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकत्र येऊन फटाके वाजवल्यास अधिक धोका वाढू शकतो. तसंच प्रदूषण वाढल्यास देखील कोरोना संसर्ग अजून पसरू शकतो, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं होतं.
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव, त्यामुळे होणारा त्रास अधिक प्रमाणात वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने फटाके विक्री आणि फटाके वाजवण्यावरही बंदी आणली आहे.राज्यात राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाकडून (NGT) पुण्यासह 17 शहरात फटाक्यांवर बंदीचा आदेश देण्यात आला आहे. सोमवारी या याचिकेवर न्या. आदर्शकुमार गोयल यांनी निकाल दिला आहे.
येत्या 30 नोव्हेंबरपर्यंत फटाक्यांवरील बंदी कायम असणार आहे. फटाके विकल्यास तब्बल 20 हजार रुपये दंड, तर फटाके वाजवल्यास 2000 रुपये दंड आकारण्यात येण्याचा आदेश देण्यात आला आहे. राज्यातील अकोला, अमरावती, औरंगाबाद, बदलापूर, चंद्रपूर, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नागपूर, नाशिक, नवी मुंबई, पुणे, सांगली, सोलापूर, ठाणे, उल्हासनगर या १७ शहरांत हवेचा दर्जा अतिशय खालावल्याची माहिती आहे.
त्यामुळे मुंबई महापालिकेने काल फटाके उडवण्यास बंदी आणली असतानाच एनजीटीने देखील कडक नियम या १७ शहरांत लागू करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, यामुळे फटाके विक्रेत्यांना जबर फटका बसू शकतो. तर, हे आदेश आता कितपत पाळले जाणार यावर देखील प्रश्न उभा राहत आहे. यासंदर्भात न्यूज १८ लोकमतने वृत्त दिलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- गमावून दाखवलं : 23 पैकी 21 जागांवर शिवसेनेच्या वाट्याला ‘नोटा’पेक्षाही कमी मतं
- कॉंग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या महाराजांचा करिष्मा; विरोधकांना धूळ चारत मोठ्या विजयाकडे वाटचाल
- बिहारच्या विजयाचे शिल्पकार देवेंद्र फडणवीस; पूर्ण निकाल येण्याआधीच भाजप नेत्याने दिलं श्रेय
- फ्रान्सच्या राष्ट्रपतीच्या प्रतिकात्मक पुतळ्याला फाशी देत अहमदनगरमध्ये आंदोलन!
- युट्युबर गौरवने केला ‘बाबा का ढाबा’ पैशाच्या घोटाळ्यावर खुलासा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
