🕒 1 min read
पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. 243 जागांसाठी तीन टप्प्यांमध्ये मतदार पार पडल्यानंतर आज मतमोजणी होणार आहे. नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांच्यासह 3733 उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला आज होणार आहे. कोरोना काळातील ही सर्वात मोठी निवडणूक आहे. राज्यात मतमोजणीसाठी 38 जिल्ह्यांमध्ये 55 मतमोजणी केंद्र स्थापन करण्यात आले आहेत.
नितीश कुमार पुन्हा सत्तेत येणार की तेजस्वी यादव विजय मिळवणार हे आज स्पष्ट होईल. बिहार विधानसभा निवडणुकीत सुरुवातीच्या कलांनुसार भाजप-जेडीयू यांच्या युतीने आघाडी घेतली आहे. बिहार विधानसभा निवडणुकीत तेजस्वी यादव यांचा करिष्मा चालणार असून महागठबंधनला स्पष्ट बहुमत मिळेल असा दावा सर्वच माध्यमांनी एक्झिट पोलद्वारे केला होता. मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर सुरुवातीच्या दोन तासांमधील चित्र जवळपास तसेच होते. मात्र १० वाजेनंतर आता दुपारी २.३० वाजेपर्यंत एनडीए अर्थात नितीश कुमार यांनी आघाडी कायम ठेवली आहे.
नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढत असलेल्या एनडीएने देखील दमदार मुसंडी मारायला सुरुवात केली आहे. आताच हाती आलेल्या कलांनुसार एनडीए सध्या १२५ जागी आघाडीवर आहे. यात भाजपा ७० जागा, जदयू ४८, व्हीआयपी ६, तर हम एका जागेवर आघाडीवर आहे. महाआघाडीने सध्या १०१ जागांवर आघाडी घेतली आहे. यात राजद ६२, काँग्रेस २० तर डावे १९ जागांवर आघाडीवर आहे.
दरम्यान,शिवसेनेने मोठा गाजावाजा करत बिहार निवडणूक लढविण्याची घोषणा केली होती. शिवसेनेच्या उमेदवारांना मोठा पराभव स्वीकारावा लागेल अशी चिन्हे दिसत आहेत.सेनेच्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होतील असे चित्र सध्या दिसत आहेत. बिहारमधील सत्ताधारी पक्ष असलेल्या जदयूने शिवसेनेच्या ‘धनुष्यबाण’ या निवडणूक चिन्हाला आक्षेप घेतल्याने शिवसेनेने उपलब्ध असेल ते निवडणूक चिन्ह घेऊन जदयू आणि भाजप यांच्याविरोधात निवडणूक रिंगणात उतरण्याची तयारी केली होती.
मात्र, सुरुवातीच्या कलानुसार शिवसेनेची कामगिरी समाधानकारक नसल्याचं चित्र आहे. 23 पैकी 21 जागांवर तर शिवसेनेच्या वाट्याला ‘नोटा’पेक्षाही कमी मतं मिळाली आहेत. निवडणूक आयोगाच्या वेबसाईटनुसार दुपारी 1.45 वाजेपर्यंत आलेल्या निकालाच्या कलांनुसार शिवसेनेला 23 पैकी 21 जागांवर ‘नोटा’पेक्षाही कमी मतं मिळाली आहेत. शिवसेनेने 50 उमेदवार देण्याची घोषणा केली होती, मात्र प्रत्यक्षात 23 जागांवरच निवडणूक लढवली.
महत्वाच्या बातम्या
- बनावट डिझेल प्रकरण; माजी मंत्र्याच्या आरोपांमुळे एकच खळबळ!
- कॉंग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या महाराजांचा करिष्मा; विरोधकांना धूळ चारत मोठ्या विजयाकडे वाटचाल
- बिहारच्या विजयाचे शिल्पकार देवेंद्र फडणवीस; पूर्ण निकाल येण्याआधीच भाजप नेत्याने दिलं श्रेय
- फ्रान्सच्या राष्ट्रपतीच्या प्रतिकात्मक पुतळ्याला फाशी देत अहमदनगरमध्ये आंदोलन!
- युट्युबर गौरवने केला ‘बाबा का ढाबा’ पैशाच्या घोटाळ्यावर खुलासा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
