भोपाळ : बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. 243 जागांसाठी तीन टप्प्यांमध्ये मतदार पार पडल्यानंतर आज मतमोजणी होणार आहे. नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांच्यासह 3733 उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला आज होणार आहे. कोरोना काळातील ही सर्वात मोठी निवडणूक आहे. राज्यात मतमोजणीसाठी 38 जिल्ह्यांमध्ये 55 मतमोजणी केंद्र स्थापन करण्यात आले आहेत.
नितीश कुमार पुन्हा सत्तेत येणार की तेजस्वी यादव विजय मिळवणार हे आज स्पष्ट होईल. तर दुसरीकडे मध्य प्रदेशातील २८ जागांच्या पोटनिवडणुकीचे निकाल समोर येत आहेत.मध्य प्रदेशमधील पोटनिवडणुकीतून भाजपा नेते ज्योतिरादित्य शिंदे यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती आता भाजपाला 28 पैकी 20 जागांवर आघाडी मिळत असल्याने त्यांचा करिश्मा चालल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे मध्य प्रदेशात ज्योतिरादित्य शिंदे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे.
काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन ज्योतिरादित्य शिंदे यांनी आपल्या समर्थक आमदारांसह भाजपात प्रवेश केला. त्यामुळे मध्य प्रदेशातील काँग्रेसचे कमलनाथ सरकार कोसळले. पक्षांतरामुळे आमदारकी गेल्यानं मध्य प्रदेशात पुन्हा निवडणूक घेण्यात आली. या निकालामुळे शिवराज सरकार तर स्थिर होईलच त्याच सोबत सिंधिया यांनी भाजपसोबत जाण्याचा जो निर्णय घेतला त्याला लोकमान्यता देखील यामुळे प्राप्त होईल.
महत्वाच्या बातम्या
- फ्रान्सच्या राष्ट्रपतीच्या प्रतिकात्मक पुतळ्याला फाशी देत अहमदनगरमध्ये आंदोलन!
- बिहारमध्ये मुख्यमंत्री पदाबाबतचा शब्द भाजप पाळणार की शब्द फिरवणार ?
- महात्मा गांधीप्रमाणे अर्णबला त्रास दिला जातोय : संबित पात्रा
- ‘आरोपीला सहानुभूती दाखवण्याऐवजी राज्यपालांनी नाईककुटुंबाला सहानुभूती दाखवायला हवी होती’
- कृषी विद्यापीठांमधील कर्मचाऱ्यांचे आंदोलन; प्राजक्त तनपुरेंनी घेतली आंदोलकांची भेट!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
