Share

औरंगाबादचे नाव संभाजीनगर केलं नाही तर शिवेसनेने हिंदुत्व सोडावं; मराठा नेत्याचं आव्हान

Published On: 

औरंगाबाद : मराठवाड्याची राजधानी अशी ओळख असलेल्या औरंगाबाद शहराचं नामांतर करुन या शहराला संभाजीनगर हे नाव देण्याची शिवसेनेची आग्रही मागणी आहे. मात्र, गेल्या 5 वर्षे शिवसेना सत्तेत असतानाही आणि विशेष म्हणजे गेल्या वर्षभरापासून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच राज्याचे मुख्यमंत्री असतानाही औरंगाबादचे संभाजीनगर झाले नाही

आता याच मुद्यावरून राजकारण रंगताना पाहायला मिळत आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, बोलताना आमचा त्यास विरोध असल्याचं थोरात यांनी ठामपणे सांगितलं आहे. महाविकास आघाडी ही किमान समान कार्यक्रमावर आधारित असून यात नामांतरापेक्षा विकासकामांना महत्व आहे असं सांगत संभाजीनगर असं नामकरण करण्यास त्यांनी विरोध केला आहे.

यामुळे, आता शिवसेनेची चांगलीच कोंडी झाल्याचं दिसत आहे. नामकरण करण्यासाठी विरोधक देखील आक्रमक झाले आहेत. सत्तेतील पक्षच विरोधी भूमिका घेत असल्याने अडचणी निर्माण होत आहेत. दरम्यान, मराठी क्रांती मोर्चाचे समनव्यक अंकुश कदम यांनी शिवसेनेला हिंदुत्व सिद्ध करण्याचं आव्हान दिलं आहे.

‘शिवसेनेने जर औरंगाबादचे नाव संभाजीनगर केले नाही तर शिवेसनेने हिंदुत्व सोडावे. सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत हे वारंवार म्हणतात की आम्हाला हिंदुत्व शिकवू नका तर आता त्यांना हिंदुत्व सिद्ध करण्याची वेळ आली आहे. संभाजीनगर नाव केले नाही तर महाराष्ट्रात आंदोलन केली जातील. ही आंदोलन आहेत ती गनिमी काव्याने केली जातील. क्रूर व्यक्ती असलेल्या औरंगजेबाच्या यावरून या शहराचे नाव औरंगाबाद असे आहे. औरंगाबाद हे नाव बदलण्यावर शिवप्रेमींनी मागणी केली आणि ते बदलण्यात येणार आहे’ असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. यासंदर्भात त्यांनी टीव्ही ९ मराठी या वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया दिली आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!