नवी दिल्ली: संयुक्त किसान मोर्चाने रविवारी उत्तर प्रदेशच्या मुझफ्फरनगरमध्ये महापंचायतीचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने जनता उपस्थित राहणार आहे. त्यामुळे या महापंचायतीला किती लोक येतील, हे सांगणं कठीण आहे.मात्र जर शेतकऱ्यांना महापंचायतीपर्यंत पोहोचण्यापासून कोणीही रोखले तर त्यांची डोकं फोडून काढू आणि महापंचायतीत पोहोचू असा इशारा राकेश टिकैत यांनी दिला आहे.
यासाठी अनेक शेतकरी पहाटेच निघणार आहेत. यासाठी अमृतसरहून पहाटे ४ वाजता, जालंधरमधून सकाळी ५ वाजता आणि लुधियानाहून सकाळी ६ वाजता एक्स्प्रेस ट्रेन असणार आहेत. यावेळी हरियाणा, महाराष्ट्र आणि भारताच्या इतर भागांतील शेतकरीही महापंचायतील मोठ्या प्रमाणात उपस्थित असणार अशी शक्यता राजेश टिकैत यांनी व्यक्त केली आहे.
या कार्यक्रमाची जबादारी ५ हजार स्वयंसेवकांना देण्यात आली आहे. तसेच शेतकऱ्यांना मैदानापर्यंत पोहोचण्यासाठी ओळखपत्र देण्यात येणार आहे. शिवाय काही अडचण आल्यास सर्व स्वयंसेवकांन आपत्कालीन क्रमांक देण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या
- सिद्धार्थच्या अंत्यविधीनंतर मुलाखती देणाऱ्या सेलिब्रिटींना अभिनेत्रीने सुनावले
- इंधन दर कमी करण्याची किल्ली अजित पवारांकडेच आहे – चंद्रकांत पाटील
- ‘गणेशोत्सव साधेपणाने साजरा करणार असल्याने नवीन निर्बंध नाहीत’ ; उपमुख्यमंत्र्यांनी दिली माहिती
- हरवलेली ‘ओबीसी मंत्रीमंडळ उपसमिती‘ शोधण्यासाठी ‘टास्क फोर्स’ची स्थापना करा – पडळकर
- एकनाथ खडसेंविरोधात ED चे एक हजार पानी आरोपपत्र दाखल, पत्नी आणि जावयाचाही समावेश
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

