🕒 1 min read
कर्नाटक: भाजपाचे नेते आणि मंत्रिमंडळातील मंत्री के. एस. इश्वरप्पा यांनी रविवारी त्यांच्या शिमोगा मतदारसंघात भाजपा कार्यकर्त्यांची बैठक घेतली होती. या बैठकीत त्यांनी वादग्रस्त विधान केले आहे. आज, भाजपाचा जगभरात प्रसार झाला आहे. आणि जर भाजपाच्या कार्यकर्त्याला जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात कुणी हात जरी लावला, तरी त्याला त्याच पद्धतीने उत्तर देण्याचे आपल्याला आदेश आहेत. याआधी कोणत्याही परिस्थितीत शांत राहण्याचे निर्देश होते. पण आता त्यांनी एकाला मारलं तर तुम्ही दोघांना मार द्या असे आदेश आहेत. आपली ताकद आता वाढली आहे. कुणीही आपल्याला त्रास देणार नाही. असे विधान इश्वरप्पा यांनी केले आहे. यामुळे भाजपवर कॉंग्रेसने टीकास्त्र सोडले आहे. तसेच त्यांच्या राजीनाम्याचीदेखील मागणी केली जात आहे.
Some yrs back, BJP/RSS workers were killed if they spoke about Hindutva in Kerala. We didn't have the strength to hit back. Our leaders tried to pacify us then. But now if anyone touches a BJP worker, they will get the same (treatment): Karnataka Minister KS Eshwarappa (08.08) pic.twitter.com/RgetS3OmFF
— ANI (@ANI) August 9, 2021
काही वर्षांपूर्वी, भाजप , आरएसएस कार्यकर्त्यांनी केरळमध्ये हिंदुत्वाबद्दल बोलले तर त्यांची हत्या झाली. आमच्याकडे परत मारण्याची ताकद नव्हती. तेव्हा आमच्या नेत्यांनी आम्हाला शांत करण्याचा प्रयत्न केला. पण आता जर कोणी भाजप कार्यकर्त्याला स्पर्श केला तर त्यांना तेच (उपचार) मिळेल. असे विधान कर्नाटक मंत्री के एस ईश्वरप्पा यांनी केले आहे.
दरम्यान या विधानावरून त्यांच्यावर आक्षेप घेतला जात आहे. मात्र वाद निर्माण झाल्यानंतर देखील ‘मी माझ्या विधानावर ठाम आहे’. असे इश्वरप्पा यांनी म्हटले आहे. आपल्या महिलांवर बलात्कार होत असताना आपण शांत बसू शकतो का?”, असा प्रतिप्रश्न इश्वरप्पा यांनी केला आहे. या विधानामुळे काँग्रेसकडून तीव्र आक्षेप घेतला जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- आमची मोर्चेबांधणी आणि तटबंदी काय असते याची भाजपला चांगली कल्पना – संजय राऊत
- आता केवळ एका मिस्ड कॉलद्वारे करता येणार गॅस सिलेंडरचे बुकिंग
- … तर मग जगातील कुठल्या देशाने भारतात येऊन ही हेरगिरी केली ? राष्ट्रवादीचा भाजपला थेट सवाल
- टी-२० विश्वचषकासाठी न्युझीलंडच्या संघाची घोषणा; ‘हा’ अनुभवी खेळाडू संघाबाहेर
- मेडल मोदी जी जीतकर लाये है क्या? कॉंग्रेस नेत्याने व्यक्त केली नाराजी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
